24 December 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात

Chandrashekhar Bawankule

मुंबई, २६ जुलै | झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.

काँग्रेसचे दोन आणि एका अपक्ष आमदार खरेदीप्रकरणी राजधानी रांची येथून ४ पथके महाराष्ट्र आणि दिल्लीत तपासासाठी निघाली आहेत. खलारी येथील पोलिस उपअधीक्षक अनिमेश नैथानी यांच्या नेतृत्वाखालील एक पथक सोमवारी दिल्लीत पोहोचले. हे पथक हाॅटेल विवांतामध्ये चाैकशी करीत आहे. याप्रकरणी अटकेतील अभिषेक दुबे याने विवांता हाॅटेलमध्ये तीन आमदारांसोबत बोलणी झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, बावनकुळे दाेन दिवस दिल्लीतच हाेते. याची पुष्टी भाजप पदाधिकाऱ्यांनीही केली. मंत्री नसल्यामुळे त्यांचा दाैरा फक्त भाजप वर्तुळातच माहिती हाेता, नंतर हा दाैरा त्यांनी डिलीट करावयास लावला, अशी माहिती नागपूरच्या एका भाजप कार्यकर्त्याने दिली.

दरम्यान, झारखंड पोलिसांच्या तपासात अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. दि. १५ जुलै सायंकाळी ६.१० च्या रांची-दिल्ली इंडिगो विमान क्र. ६ ई- २३२८ चा पीएनआर ओएमझेडएमआरडब्ल्यू आणि आयजीसीटी २व्ही चा तपशील पोलिसांनी शोधला आहे. त्यानुसार एका पीएनआरवर तीन आणि दुसऱ्या पीएनआरवर चार जणांनी प्रवास केला होता. दिल्लीला जाणाऱ्या आमदारांमध्ये उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि अमित यादव यांची नावे समोर आली आहेत. या तीन आमदार व उमाशंकर अकेला यांचा नातू हर्षवर्धन हा सुध्दा सोबत होता. पोलिस त्याचीही चौकशी करणार आहेत.

हॉटेल ली लॅकच्या तीन खोल्यांची ४ दिवसांची ऑनलाइन बुकिंग:
एक्सपीडिया अॅपवरुन हॉटेल ली लॅकमधील ४ रुम्स बुक करण्यात आल्या होत्या. ही बुकींग २१ ते २४ जुलैसाठी होती. मुंबईहून गेलेले आशुतोष ठक्कर, मोहित भारतीय आणि अनिल यादव यांनी २१ जुलै रोज हॉटेल लीलॅकमध्ये चेक इन केले होते. ठक्कर खोली क्र.३०७, मोहित भारतीय खोली क्र.३१०, जय बेलखेडे खोली क्र.४०७ आणि अनिल यादव खोली क्र. ६११ मध्ये थांबले होते. परंतु २२ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता पोलिस छापा टाकण्यासाठी पोहोचण्यापूर्वी २० मिनीटे अगोदर हे सर्व हॉटेलमधून पसार झाले.

बावनकुळे दिल्लीतच होते, भाजप नेते चरणसिंग ठाकूर:
नागपूर | १५ जुलै रोजी मी आणि चंद्रशेखर बावनकुळे सोबतच दिल्लीला गेलो. आमचा ऑफिशियल दौरा होता, अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी दिली. काटोल नगर परिषदेचे पंतप्रधान आवास याेजनेचे अनुदान अडले होते. म्हणून बावनकुळे यांच्यासोबत मीही गेलो. त्यांनीच माझे तिकीट काढले. मी दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी परत आलो, तर बावनकुळे इतर मंत्र्यांकडील कामासाठी तिथेच थांबले, असे ठाकूर यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार:
नैथानी यांच्या नेतृत्वाखालील झारखंड पोलिसांचे पथक हॉटेल विवांतामधील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. तर मुंबईत आलेले पथक २१ जुलै रोजी रांंची येथील हॉटेल लीलेकमध्ये थांबलेल्या चार जणांची चौकशी करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेले अभिषेक दुबे, अमितसिंह आणि निवारण प्रसाद महतो यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jharkhand police squad in Mumbai Chandrashekhar Bawankule will be questioned news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x