14 January 2025 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

भाजपच्या मंत्र्याची CD व्हायरल | नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Karnataka minister Ramesh Jarkiholi, objectionable CD, political crisis

बंगळुरू, ०३ मार्च: भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. (Karnataka minister Ramesh Jarkiholi objectionable CD case political crisis)

जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. कलहळ्ळी यांनी जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. या सीडीमध्ये जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा त्यांनी केलाय. (He claimed that in the CD, Jarkiholi was talking about having sex with a young woman)

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. (Dinesh Kalhalli, chairman of the Civil Rights Struggle Committee, has brought the CD case before the media)

ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: The BJP ruled Karnataka has been rocked by an objectionable CD case. A complaint has been lodged against Water Resources Minister Ramesh Jarkiholi in the BJP government in Karnataka in this objectionable CD case. The CD, released by a social activist, features Ramesh Jarkiholi allegedly with a young woman. Meanwhile, Ramesh Jarkiholi has said that there is a political conspiracy in this regard.

News English Title: Karnataka minister Ramesh Jarkiholi objectionable CD case political crisis news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x