Aryan Khan Case BJP Connection | नोकरीचं खोटं आमिष देऊन लोकांची फसवणूक करणारा NCB'च्या कारवाईत सहभागी?

मुंबई, ०६ ऑक्टोबर | एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना (Aryan Khan Case BJP Connection) घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.
Aryan Khan Case BJP Connection. SK Govasai who was seen with AryanKhan during the NCB raid & arrest. Gosavi is private detective per per his profile. The fraudulent case has been registered against him duping the person for Rs 3 lakh in promise of job. NCP asks how private person can be involved in NCB raid :
काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.
मोदी, अमित शहा आणि फडणवीसांचा खास:
कथित एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यन खानसोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोक या फोटोला वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर करत असून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
NCB’च्या कारवाईत फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली व्यक्ती:
NCB’च्या छापा आणि अटकेदरम्यान एस.के. गोसावी जो आर्यखानसोबत दिसला होता. त्याचं देखील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गोसावीच्या प्रोफाईलनुसार तो एक खाजगी गुप्तहेर आहे. नोकरीचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल आहे. एनसीबीच्या छाप्यात खाजगी व्यक्ती कशी सामील होऊ शकते, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi
— ANI (@ANI) October 3, 2021
भानुशाली यांची हास्यास्पद प्रतिक्रिया:
मनिष भानुशाली म्हणाले की, ‘मला थोडी माहिती मिळाली होती. ती माहिती ड्रग्ज पार्टीबद्दल होती. ड्रग्जचा विळखा तरूण पिढीला कमकुवत बनवतो आहे. हे कोण लोकं आहे त्यांना पकडलं पाहिजे या उद्देशाने मी NCB ला यासंदर्भातली माहिती दिली. या लोकांना पकडलं पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी ही माहिती NCB ला दिली. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कारवाई केली.’
तुम्ही तिथे रेड करताना गेला होतात का? असं विचारलं असता भानुशाली म्हणाले की, ‘आम्ही त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई NCB ने केली. मी सोबत चाललो होतो, आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. देशहिताचं जे काम आहे ते आम्ही केलं. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही’ असंही भानुशाली यांनी म्हटलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Aryan Khan Case BJP Connection private person SK Gosavi was involved in NCB raided.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल