राणे स्वतः पत्रकारितेत | तरी लिखाणावरून लोकपत्र वृत्तपत्राच्या कार्यालयावर समर्थकांचा हल्ला
औरंगाबाद, ३१ मे | नारायण राणे स्वतः पत्रकारितेत असून प्रहार नावाचं वृत्तपत्रं चालवतात. मात्र आज घडलेल्या धक्कादायक प्रकारातून त्यांनी स्वतःच पत्रकारितेची मूल्य आणि स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
वृत्तपत्रात आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या रागातून राणेंच्या कार्यकर्त्यांनी संपादक रवींद्र तहकीक यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याची माहिती आहे. औरंगाबादमध्ये काल रविवारी दुपारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे.
‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. नारायण राणे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील वादावर हा लेख लिहिला होता. राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांचा फोटो लेखाला लावण्यात आला आहे. राणे यांच्याबाबत लेखात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राणे यांच्या संतप्त समर्थकांनी हल्ला केल्याची माहिती आहे.
News English Summary: It is learned that Rane’s activists blackened the face of editor Ravindra Tehkeek out of anger over the offensive writing in the newspaper. The incident took place in Aurangabad on Sunday afternoon.
News English Title: Lokpatra newspaper editor Ravindra Tehkik attacked by MP Narayan Rane supporters in Aurangabad news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम