23 December 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी हडपले | शिल्पा शेट्टी व तिच्या आई विरुद्ध FIR दाखल

Raj Kundra

मुंबई, १० ऑगस्ट | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते. यानंतर शिल्पाच्या जवळच्या लोकांनीच ते हडप केले. ज्योत्सनाला गुंतवणूक करण्यापूर्वी शिल्पा शेट्‌टीचा व्हिडिओ दाखवण्यात आला होता.

ज्योत्सनाने पुढे सांगितल्यानुसार, जानेवारी 2019 मध्ये तिची भेट शिल्पा शेट्टीच्या जवळची व्यक्ती आणि अयोसिस कंपनीचा संचालक किरण बाबा याच्याशी झाली. किरणने ज्योत्सनाला कंपनीचे अनेक प्रेझेंटेशन दाखवले. सोबतच फ्रेंचायझी घेतल्यास दरमहा 5 लाख रुपये कमाई होणार असे आश्वासन दिले होते.

4 पट महागात साहित्ये विकून लाखो रुपयांना लुटले:
ज्योत्सनाने सांगितले, की सेंटर उघडल्यानंतर आरोपींनी टॉवेलपासून वॉलपेपर पर्यंत आपल्याच मर्जीने लावले. यानंतर कॉस्मेटिक आणि इतर सर्व साहित्ये मुंबईतून मागवले. जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये 5 हजार रुपयांत मिळू शकतात त्यासाठीच 15-15 हजारांप्रमाणे बिल पाठवायचे. काही दिवसांनंतर कंपनीकडून स्वतःचे कर्मचारी लावून सेंटर काबीज केली.

FIR दाखल होताच शिल्पाने शेअर्स विकले:
सेंटरवर बाबाने ताबा घेतल्यानंतर ज्योत्सनाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत ज्योत्सनाने 1.36 कोटी रुपये गुंतवले होते. आपली एवढी मोठी रक्कम बुडत असल्याचे पाहून तिने विभूतिखंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपल्या विरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचे ऐकताच शिल्पाने स्टेटमेंट जारी केले. तसेच आपली कंपनी अयोसिसचे शेअर्स किरण बाबाला विकत असल्याचे जाहीर केले. आता आपला या कंपनीशी काहीच संबंध नाही असेही शिल्पाने स्पष्ट केले.

शिल्पा शेट्टीची चौकशी होणार:
विभूतिखंड पोलिलांनी 19 जून 2020 रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. परंतु, कित्येक दिवसांपासून कारवाईच केली नाही. त्यानंतर या प्रकरणाचा तपास चिनहट पोलिस स्टेशनमध्ये वळवण्यात आला. याची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक अजय शुक्ला यांना देण्यात आली. शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत झालेल्या चौकशीत फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. ज्योत्सनाने करार करून घेतला त्यावेळी शिल्पा शेट्टी अयोसिस कंपनीची चेयरपर्सन आणि आई सुनंदा संचालक होती. यांचा देखील तपास करण्यासाठी चौकशी होणार आहे. यासाठी औपचारिक कारवाई सुरू आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Lucknow police registered FIR against Shilpa Shetty and her mother in fraud case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x