23 February 2025 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

महाराष्ट्र ATS आणि मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | दहशतवादी कारवाई प्रकरणी मुंबईतून एकाला अटक

Maharashtra ATS

मुंबई, १८ सप्टेंबर | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी एका जणास नागपाडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयित आरोपीचे नाव झाकीर असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, झाकीरला आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक मुंबईला रवाना झाले आहे.

महाराष्ट्र ATS आणि मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | दहशतवादी कारवाई प्रकरणी मुंबईतून एकाला अटक – Maharashtra ATS and Mumbai Police crime branch has arrested one person from Nagpada over terrorist activity :

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी पाकिस्तानच्या हँडलरकडून चालविल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या मॉड्यूलशी संबंधित 6 लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन जण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेले होते. सणासुदीच्या कालावधीदरम्यान दिल्ली, यूपी, महाराष्ट्रात स्फोट घडविण्याचा कट ते रचत होते. त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, मुंबईचा रहिवासी झाकीरही त्यांच्यासोबत कटात सहभागी होता. यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी झाकीरला नागपाड्यातून पकडले. आता त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्पेशल सेलची टीम मुंबईला रवाना झाली आहे. ही टीम त्याला दिल्लीला घेऊन येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात ओसामाचा मामा हुमेद उर रेहमानला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस यूपीतही गेले आहेत. त्याने काल प्रयागराजच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलीस पथक त्यालाही दिल्लीला घेऊन येईल. तिथे त्याची पुढील चौकशी केली जाईल. या प्रकरणात इतर अनेक आरोपींना अटक केली जाऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबईतील जान मोहम्मदच्या चौकशीनंतर कारवाई:
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या चार जणांची टीम दिल्लीला पोहोचली आहे. जानची कसून चौकशी केली जात असून आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. जानच्या चौकशीतून अनेक प्रकरणांचा उलघडा होऊ शकतो, असे अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान या दहशत वाद्यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त रित्या कारवाई करत जोगेश्वरी मधून एकाला अटक केली आहे.

Maharashtra ATS Arrested Suspected Terrorist Zakir Jogeshwari In Mumbai Connection 6 Terrorists :

डॉन दाऊद इब्राहीम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीतील घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जान मोहम्मद शेख या संशयित आरोपीचे वीस वर्षापूर्वी दाऊद गॅंगशी संबंध होते. वीस वर्षांपूर्वी तो दाऊदसाठी काम करत होता. या लिंकमुळेच ही व्यक्ती महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर होती. मात्र सध्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडे कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नाहीत. त्यानंतर त्याच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी एटीएसकडून केली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Maharashtra ATS and Mumbai Police crime branch has arrested one person from Nagpada over terrorist activity.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x