5 November 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास करत नाहीत | अशा प्रकरणांमध्ये गुन्हा मानूनच तपास करतात

DGP Hemant Nagrale, Pooja Chavan, suicide case

नागपूर, २५ फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते गुरुवारी नागपूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. या तपासाविषयी मला सर्व गोष्टी जाहीर करता येणार नाहीत. मात्र, पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. पोलिसांचा तपास हा तथ्यावर चालतो. जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास चालत नाही, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

तत्पूर्वी, चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकणावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री एकत्रित आले आहेत असा आरोप वाघ यांनी केला आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी कुणाच्या लेखी परवानगीची गरज आहे? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ गुरुवारी पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासाची प्रगती पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वरिष्ठ PI दीपक लगड यांनी मग्रुरी दाखवल्याचा आरोप वाघ यांनी केला. यावर भाष्य करताना हेमंत नगराळे यांनी हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. आज पुण्यात काय घडले मला ते माहीत नाही. मात्र, प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

 

News English Summary: Pooja Chavan’s death is a case of suicide. In such cases, the police always investigate the crime, said the state’s Director General of Police Hemant Nagarale. He also clarified that the investigation of Pune police in this case is going in the right direction.

News English Title: Maharashtra DGP Hemant Nagrale on Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x