23 November 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

मणिपूर आदिवासी महिला घटनेवरून देश हादरला! BJP हटाओ आदिवासी बचाओ, नरेंद्र मोदी इस्तीफा दो! देशभरातून सोशल मीडियावर ट्रेंड

Manipur viral video

Manipur Women Case | हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील मणिपूर राज्यातून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव रस्त्यावर दोन आदिवासी महिलांना नग्न अवस्थेत फिरवल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून देशभरातून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. सर्वत्र नग्न परेड केल्यानंतर शेजारच्या शेतात या दोन महिलांवर जमावाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका स्थानिक आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने (आयटीएलएफ) दिलेल्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली.

हिंसाचाराच्या आगीत मणिपूर

कॅमेऱ्यात कैद झालेली ही भीषण घटना मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान घडली आहे. मैतेईंच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जाच्या मागणीवरून खोऱ्यातील बहुसंख्य मैतेई आणि डोंगरीबहुल कुकी जमातीत संघर्ष झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

दरम्यान, मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न अवस्थेत त्यांची परेड केल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली असून या प्रकरणाची सुनावणी २८ जुलै रोजी ठेवली आहे. या संपूर्ण घटनेबाबत न्यायालयाने केंद्र सरकारकडून अहवाल ही मागवला असून वेळीच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहिल्यांदाच या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दोन महिलांना नग्न अवस्थेत परेड केल्याच्या व्हिडिओमुळे आपण व्यथित झालो आहोत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही सरकारला कडक शब्दात कारवाई करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारची घटना पूर्णपणे अस्वीकार्य असून ती अत्यंत दु:खद आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे संविधान आणि मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारने काही केले नाही तर आम्ही कारवाई करू, असा इशाराही दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडून अहवाल ही मागवला आहे. लोकशाहीत हिंसेचे साधन म्हणून महिलांचा वापर अजिबात मान्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नरेंद्र मोदी इस्तीफा दो! सोशल मीडियावर तुफान ट्रेंड

दरम्यान, या भीषण घटनेनंतर संपूर्ण देशभरात “बीजेपी हटाओ आदिवासी बचाओ” आणि “नरेंद्र मोदी इस्तीफा दो!” सोशल मीडियावर तुफान ट्रेंड करत असून नेटिझन्समध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ शेअर करून मोदी सरकारप्रति स्वतःचा संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अल्टिमेटम नंतर आणि देशभर रोष उमटल्याचे पाहून अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ महिन्यांहून अधिक काळाले बोलल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे गोडी मीडिया यावर तोंड बंद करून बसल्याने जनतेचा संताप असून शिगेला पोहोचला आहे.

News Title : Manipur viral video parade of naked women cruelty check details on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Manipur viral video(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x