14 January 2025 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

मनसुख यांच्या वकिलाचा गौप्यस्फोट | वाझे त्यांचे चांगले मित्र होते, उलट त्यांनी मदत केली

Mansukh Hiren, Sachin Vaze, Mumbai Police

मुंबई, १३ मार्च: मनसुख हिरेन यांना सल्ला देणारे वकील गिरी यांनी हिरेन यांच्याशी झालेल्या संवादाबाबत माहिती देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचं पारडं काहीसं जड होण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मनसुख हिरेन यांची गाडी १७ फेब्रुवारीला चोरीला गेली होती. १८ तारखेला त्यांनी विक्रोळी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर ही गाडी अंबानींच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्यामागे पोलीस आणि माध्यमांचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे हिरेन यांनी माझ्याकडून याबाबत प्रत्यक्ष भेटून कायदेशीर सल्ला देखील घेतला होता. (Mansukh Hiren advocate Giri gave important information over his legal advice about Sachin Vaze)

मनसुख हिरेन यांना झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या वकिलांनी सांगितले की, दर एक दोन तासांनी कुठून ना कुठून पोलीस यायचे, प्रश्नांची सरबत्ती केली जायची. कुटुंबीयांना झोपू दिले जात नसे. प्रसारमाध्यमांकडूनही वारंवार विचारणा व्हायची आणि त्यामुळे मानसिक त्रास व्हायचा. त्यामुळे मनसुख हिरेन आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड त्रस्त होते. परंतु, माध्यमांमध्ये येतंय त्याप्रमाणे सचिन वाझेंसोबत त्यांनी मला कधीच सांगितले नव्हते. उलट पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आपले चांगले मित्र आहेत. त्यांनीच मला सर्वाधिक मदत केली आहे, असे त्यांनी मला सांगितले होते, असा दावा हिरेन यांचे वकील गिरी यांनी केला आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षाच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 10 मार्च रोजी सभागृहातून घोषणा केली होती की वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आले. त्यानंतर 12 मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून स्पेशल ब्रांचला बदली करण्यात आली होती.

आता मनसुख हिरेन प्रकरणी अटक होऊ नये यासाठी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. कोर्टाने हा अर्ज स्वीकारून सुनावणीसाठी 19 मार्चची तारीख दिली आहे.

 

News English Summary: Mansukh Hiren never told me about Sachin Vaze as reported in the media. On the contrary, police officer Sachin Vaze is our best friend. He had told me that he had helped me the most, Giri, Hiren’s lawyer, claimed.

News English Title: Mansukh Hiren’s advocate Giri gave important information over his legal advice about Sachin Vaze news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x