2 January 2025 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट | मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक

artist Mayuresh Kotkar arrested

नवी मुंबई, १५ जून | शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता कोर्ट कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Marathi artist Mayuresh Kotkar arrested after posting objectionable statement on social media against minister Eknath Shinde news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x