22 January 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल

Suvendu Adhikari

कोलकत्ता, १७ मे | बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. आता या सर्वांना कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.

या कारवाईदरम्यान पुन्हा एकदा केंद्र आणि बंगाल सरकार आमने-सामने आलेले दिसत आहेत. आपल्या मंत्र्यांच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी त्या सीबीआयला म्हणाल्या- मलाही अटक करा. सरकारच्या वकीलाने म्हटले की, नोटिस दिल्याशिवाय मंत्री आणि आमदारांना अटक करता येत नाही. ममता CBIच्या कार्यालयात गेल्यानंतर तृणमूल कार्यकर्तेही तेथे जमले आणि दगडफेक केली. यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आणि स्ट्रिंग ऑपरेशन करणारे पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्न थेट टीएमसीतुन भाजपात गेलेल्या सध्या प. बंगालमध्ये विरोधीपक्षनेते असलेल्या सुवेंदु अधिकारी यांच्या बाबतीत केला आहे. सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? तसेच लाच घेतल्याचे आरोप मुकुल रॉय यांच्याबाबतीतही असल्याने त्यांच्यावरील कारवाईचं काय, असा थेट प्रश्न त्यांनी ऑन रेकॉर्ड उपस्थित केल्याने भाजपच्या देखील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

2016 मध्ये बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा न्यूज पोर्टलने टेप जारी केले होते. या स्टिंग ऑपरेशननंतर दावा करण्यात आला की, टेप 2014 मध्ये रेकॉर्ड केले आहेत. टेपच्या हवाल्याने तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदारांना डमी कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप लावला होता. हायकोर्टाने 2017 मध्ये याचा तपास CBIकडे सोपवला होता.

 

News English Summary: What happened to Suvendu Adhikari? He also received money from me. It was recorded. And handed over to CBI. Justice has to go everywhere, in the same manner said Mathew Samuel a Man behind Narada Scam string operation.

News English Title: Mathew Samuel a journalist behind string operation of Narada Scam allegations on Suvendu Adhikari news updates.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x