15 November 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मनसेचे आमदार राजू पाटील यांना ईडीचे समन्स | नेमकं काय आहे प्रकरण? - वाचा सविस्तर

MNS MLA Raju Patil

मुंबई, ०७ जुलै | ईडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटलांना त्यांच्या जबाब नोंदविण्यासाठी 23 जून रोजी समन्स बजावला होता. ते जबाब देऊन आले आहेत. ते आज मुंबईत कामानिमित्त गेले असता आता या प्रकरणी त्यांची काही गरज आहे का? हे विचारण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. पण ईडीच्या कार्यालयातील राजू पाटील यांच्या जाण्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राजू पाटील यांनी योग्य कारण सांगत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. त्यांनी सांगितलेली माहिती तर धक्कादायक आहेच. याशिवाय आपल्या लोकप्रतिनिधींना सुरक्षेची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित होते

मुंबई क्राईम ब्रांचने 2015 साली दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती. डोंबिवलीत राहणारा विपीन पाटील हा मोठा दारु विक्रेता आहे. दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांवर गंभीर आरोप आहेत. दयानंद आणि विपीन हे ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत, कोणत्या बिल्डरचे काम सुरु आहे, कोणत्या नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल, अशाबाबतची सर्व माहिती परदेशात बसलेल्या कुख्यात डॉन रवी पूजारीला द्यायचे. ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणते गुन्हेगार आपल्यासाठी कामाला येऊ शकतात, अशी देखील माहिती ते रवी पुजारीला पुरवायचे.

दयानंद जाटान आणि विपीन पाटील यांनी रवी पुजारीला मनसे आमदार राजू पाटील यांची सुपारी दिली होती. यासाठी त्यांनी 15 लाख रुपये रवी पुजारीला पाठवले होते. आता रवी पुजारीला अटक करुन भारतात आणलं गेलं आहे. रवी पूजारीशी संबंधित सगळ्या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. विपीन याने राजू पाटील यांची सुपारी दिल्याने आमदार या प्रकरणी साक्षीदार म्हणून आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Kalyan Gramin MLA Raju Patil visit ED office in Mumbai on Ravi Pujari case news updates.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x