15 January 2025 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

काँग्रेस मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार

Mumbai congress, Arnab Goswami, Whatsapp chat leaked

मुंबई, २४ जानेवारी: भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.

तत्पूर्वी हा देशद्रोहाचा प्रकार आहे असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. सचिन सावंत यांनी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन संबंधित मागणी केली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील अर्णब गोस्वामी विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने थेट आंदोलन करत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीने सांगितलं होतं की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसअप संभाषणातून देशातील अनेक संवेदनशील बाबी उघड झाल्या. हा देशद्रोहाचा प्रकार असून अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी विद्या चव्हाण आणि आणि प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

 

News English Summary: How did Arnab Goswami get sensitive information about Indian Army operations three days in advance? Conversations with Arnab and Parthodas Gupta have revealed that the military action in Balakot as well as the terrorist attack in Pulwama were also discussed. The Congress has now taken a big decision as the central government has not taken any steps against it.

News English Title: Mumbai congress decided to get aggressive against Arnab Goswami after Whatsapp chat leaked news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x