BREAKING | परमवीर सिंगांच्या आदेशाने सचिन वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस | अहवालात खुलासे
मुंबई, ७ एप्रिल: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे. TV 9 मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे.
दरम्यान, परमबीर सिंग आज सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
News English Summary: A report sent to the Home Ministry by Mumbai Police Commissioner Hemant Nagarale has blamed former Commissioner of Police Paramvir Singh. Sachin Waze was re-appointed in a meeting attended by Paramvir Singh. The report sent by the Mumbai Police Commissioner to the Home Department has reached the hands of the media. TV 9 Marathi has published news about this.
News English Title: Mumbai Police commissioner Hemant Nagrale sends report to home ministry on Param Bir Singh Sachin Vaze case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा