8 September 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी मोहीम चालवण्यात आली | काही प्रसारमाध्यमांकडून खोटी माहिती

Mumbai Police Commissioner Paramveer Singh, Sushat Singh Rajput Death Case, Media, Fake Information

मुंबई, 06 ऑक्टोबर : सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आरोपांना उत्तर दिलं असून आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने तपास केला होता असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काही जण मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते असा आरोप केला असून एक मोहीम चालवली जात होती अशी माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करणाऱ्यांना जाहीर आव्हानही दिलं आहे.

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आलं. याप्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

एम्सच्या अहवालावर पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया:
सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला दिला. या अहवालावर प्रतिक्रिया देताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, “तपासादरम्यान मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्यासाठी आणि दलाची बदनामी करण्यात आली. मात्र एम्सच्या अहवालाचं आश्चर्य वाटलं नाही. कारण आमच्या तपास योग्य दिशेने सुरु होतं. सत्य समोर येतंच.”

 

News English Summary: Two cases have been registered against actor Sushant Singh Rajput for defaming Mumbai Police Commissioner Parambir Singh. This information has been given by Rashmi Karandikar, Deputy Commissioner, Cyber ​​Cell, Mumbai Police. The image of the Mumbai Police Commissioner was tarnished on various social media platforms like Twitter, Instagram, Facebook. Indecent language was used against him and the Mumbai police force was defamed. In this case, two cases have been registered under the IT Act on several social media accounts and fake accounts, informed Rashmi Karandikar.

News English Title: Mumbai Police Commissioner Paramveer Singh On Sushat Singh Rajput Death Case Media Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x