23 February 2025 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

TRP Scam | रिपब्लिक TV विरुद्ध १५ जानेवारीनंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता

Mumbai Police, Republic TV, TRP scam

मुंबई, ६ जानेवारी: टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांना आता ठोस पुरावे मिळाले असल्याने अर्णब गोस्वामी यांच्याविषयी कठोर कारवाई तूर्तास न करण्याची आमची ग्वाही आणखी पुढे सुरू ठेवू इच्छित नाही’, असे म्हणणे आज मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मुंबई हायकोर्टात मांडले.

अर्णब गोस्वामी यांच्यातर्फे कोर्टात बाजू मांडणार असणारे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी काही अपरिहार्य कौटुंबिक कारणामुळे आज युक्तिवाद करण्यास उपलब्ध नव्हते. ती बाब कोर्टापुढे ठेवत पुढची तारीख द्यावी आणि तोपर्यंत अर्णब यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती अॅड. निरंजन मुंदरगी यांनी कोर्टाकडे केली. ही विनंती मान्य करत हायकोर्टाने याप्रकरणी १५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. यावर केवळ तोपर्यंतच (१५ जानेवारी) कठोर कारवाई न करण्याची ग्वाही कायम ठेवण्याची तयारी सिब्बल यांनी दर्शवली. पोलिसांचे हे म्हणणे नोंदीवर घेऊन हायकोर्टाने सुनावणीची पुढील तारीख दिली आहे.

दरम्यान रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक-संपादक अर्णव गोस्वामी यांनी सहा वेळा भेटून पैसे दिल्याचे बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांनी म्हटले आहे. यातील तीन वेळा मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी पोलिसांना दिला आहे. या ठिकाणी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘रिपब्लिक’कडून हॉलिडे पॅकेज; तसेच रोख मोबदला दासगुप्ता यांना मिळाला असून, यातून त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे.

मुंबई येथील मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी दासगुप्ताला २८ डिसेंबर, २०२० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, नंतर ती ३० डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आणि त्यानुसार न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोंस्वामीला अजून मोठा धक्का बसला आहे.

 

News English Summary: Now that the police have got solid evidence in the TRP scam case, we do not want to continue our testimony of not taking strict action against Arnab Goswami,” senior advocate Kapil Sibal told the Mumbai High Court on behalf of the Mumbai police.

News English Title: Mumbai Police could take a big action against Republic TV over TRP scam after 15 January news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x