TRP Scam | आरोपींविरोधात १४०० पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल | मालकांचे धाबे दणाणले
मुंबई, २५ नोव्हेंबर: मुंबई पोलिसांकडून TRP Scam ची चौकशी मोठ्या वेगाने पुढे सरकत आहेत. ज्या वेगाने चौकशी पुढे सरकत आहे त्याच वेगाने धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. आता TRP घोटाळ्यात प्रचंड प्रमाणात पैशाची अफरातफर तसेच देवाणघेवाण झाल्याची धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली. विशेष म्हणजे त्यासाठी चक्क हवालाचा वापर झाल्याने मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती संबंधित आरोपींच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे.
मात्र या चौकशीतून रिपब्लिक टीव्हीच्या बाबतीत अजून धक्कादायक माहिती समोर येत असून त्यांच्या भोवतीचा पोलिसांचा सापळा अजून मजबूत होताना दिसत आहे. कृत्रिमरित्या TRP वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै या एकूण ७ महिन्यांच्या कालावधीसाठी रिपब्लिक वृत्त वाहिनीकडून तब्बल १ कोटीपेक्षा जास्त रक्कम स्वीकारल्याचे संबंधित आरोपीने मुंबई पोलिसांच्या चौकशीत मान्य केले आहे. विशेष म्हणजे अधिकृत माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात दिली आहे. परिणामी रिपब्लिक टीव्हीची पाय खोलात अडकू लागले आहेत.
दरम्यान टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam) मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (Mumbai Police’s Special Investigation Team) मंगळवारी १२ आरोपींविरोधात १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले (filed a 1,400-page charge sheet against 12 accused in the TRP scam). या आरोपपत्रामध्ये १४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून, दोन माफीचे साक्षीदार आहेत. संपूर्ण आरोपपत्रामध्ये घोटाळा झाल्याचे सिद्ध करण्यासाठी तांत्रिक पुराव्यांवर भर देण्यात आला असून, यामध्ये आरोपी असलेल्या वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहार संबंधीच्या फॉरेंसिक ऑडिटचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, आरोपपत्र दाखल करण्यात आले, तरी तपास याच गतीने सुरू राहणार असून वाहिन्यांच्या चालक, मालकांसह इतर काहींना वॉन्टेड आरोपी दाखविण्यात आल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
टीआरपी मोजण्यासाठी ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी बार्कने नेमणूक केलेल्या हंसा रिसर्च ग्रुप या कंपनीमार्फत तक्रार देण्यात आल्यानंतर ६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे देऊन कृत्रिमरीत्या टीआरपी वाढविला जात असल्याचे उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहायक पोलिस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली सचिन वाझे, प्रकाश ओव्हाळ, नितीन लोंढे, रियाझुद्दीन काझी, बिपीन चव्हाण, कीर्ती माने या पोलिसांचे विशेष पथक तयार केले. गुन्हे शाखेतील इतर युनिटचे अधिकारी देखील त्यांच्या मदतीला देण्यात आले.
News English Summary: Mumbai Police’s Special Investigation Team (SIT) on Tuesday filed a 1,400-page charge sheet against 12 accused in the TRP scam that rocked the television sector. The charge sheet recorded the testimony of 140 people and two apology witnesses. The entire indictment focuses on technical evidence to prove fraud, including a forensic audit of the financial channels of the accused. In particular, even if the charge sheet is filed, the investigation will continue at the same pace.
News English Title: Mumbai Police filed a 1400 pages charge sheet against 12 accused in the TRP scam news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News