15 November 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मुंबई पोलिसांच्या टीमने रश्मी शुक्लांचा हैदराबादेतील निवासस्थानी जबाब नोंदवला

Mumbai Police

हैदराबाद, २५ मे | फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.

ऑफिशिअल सेक्रेटस अॅक्ट 1923 अंतर्गत दाखल एफआयआर प्रकरणी गेल्या आठवड्यात रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद निवासस्थानी जबाब नोंदवला गेला. पुढील कार्रवाईसाठी मुंबई पोलिसांची टीम तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात गुन्हा दाखल असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, रश्मी शुक्ला यांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत मुंबईत येण्यास नकार दिला होता. इतकीच गरज असेल तर मला प्रश्न पाठवा, मी उत्तर देते, असेही शुक्ला यांनी कळवले होते. मात्र, त्यानंतरही मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते.

 

News English Summary: Mumbai Police has finally recorded the reply of senior IPS officer Rashmi Shukla in the phone tapping case. It is learned that a team of 5 officers of Mumbai Police went to his residence in Hyderabad and interrogated Shukla. In reply, Shukla denied the allegations made in the FIR in the phone tapping case. Maharashtra cadre IPS officer Rashmi Shukla is currently on central deputation in Hyderabad.

News English Title: Mumbai Police has recorded the reply of senior IPS officer Rashmi Shukla in the phone tapping case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x