23 February 2025 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबईत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता | मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय

Mumbai Police, High alert, Drone and missile attack

मुंबई, २७ ऑक्टोबर: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.

दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ड्रोन, रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या छोट्या विमानांनी हा हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.त्याचबरोबर पॅराग्लायडरच्या मदतीनेही हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील मंदिरं, गर्दीची ठिकाणं ही दहशतवाद्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर आहे. याआधीही मुंबईत घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून महिन्याभरासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

 

News English Summary: Intelligence agencies have alerted police and security forces about a possible terror attack in India’s financial capital Mumbai during the festive season. According to inputs shared by intelligence agencies, terrorists are planning to launch an attack in the city and might use either drones, remote control micro-light aircraft, aerial missiles, or paragliders. Agency inputs added that the terrorists are planning to carry out the attack within the next month.

News English Title: Mumbai Police High alert possibility of drone and missile attack on Mumbai News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x