TRP Scam | फॉरेन्सिक ऑडिट सुरू | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स
मुंबई, २७ ऑक्टोबर: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलवडेच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करत, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्यात रविवारी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेली दहावी अटक आहे.
दुसरीकडे पैशाचे अमिष दाखवून अनेक घरांमध्ये टीआरपी मशिन बसवून टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘रिपब्लिक टीव्ही’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स जारी केले आहे. त्यामुळे आता ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता या पाच गुंतवणूकदारांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येवू शकतं. महत्त्वाचं म्हणजे यातील चार कंपन्यांचे मुख्य कार्यालय कोलकात्यात आहेत. या कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत याची देखील चौकशी होणार आहे.
याप्रकरणी वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. आरपीजी कंपनीने १० कोटी रुपयांची, तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे. समन्स पाठवण्यात आलेल्या ५ कंपन्यांपैकी २ कंपन्यांच्या संचालकांना ३० ऑक्टोबरला चौकशीस हजर राहण्याची सूचना केली.
दरम्यान टीआरपी घोटाळ्याप्रकरणी हंसा रिसर्च ग्रुप ही कंपनी तक्रारदार आहे. हंसा रिसर्च ग्रुप कंपनीचे देखील रिपब्लिक वाहिनीसोबत आर्थिक व्यवहार होते. मात्र हंसाने बीएआरसीला अंधारात ठेवले. टीआरपी मोजण्यासाठी बार्कने ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी हंसा कंपनीची नियुक्ती करण्यात आली.
रिपब्लिकच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी चॅनेलची लोकप्रियता वाढल्याचे भासवण्यासाठी अनेक गैरप्रकार केल्याच्या तक्रारीही गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या हरीश याचे अभिषेकच्या मॅक्स मीडिया कंपनीच्या बँक खात्यात संशयास्पद देवाणघेवाण झाल्याचेही समोर आले आहे. तसेच दोघांमध्ये घनिष्ट संबंध असून, याबाबतही अधिक तपास सुरू आहे. अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी खोटे साक्षीदार तयार करून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही या वेळी न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान, अभिषेकसह वर्मा, विश्वकर्मा, पाटील या आराेपींना २८ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.
News English Summary: The Mumbai Police has summoned investors in Republic TV to join its probe in the television rating point (TRP) manipulation case. According to sources, the city police’s crime branch, which is probing the case, has summoned owners of RPG Power Trading Ltd, Anant Udyog LLP, Purvanchal Leasing Ltd, Pan Capital Investment, and Dynamic Storage and Retrieval Systems Private Ltd to join the investigation on Friday. Sources say an alleged one-time payment made by Hansa Research Group
News English Title: Mumbai Police summons to five investors of Republic tv channel News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो