22 November 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बागेत १३ तोळे सोनं व रोकड | रिक्षात विसरलेली बॅग मुंबई पोलिसांनी काही वेळात मिळवून दिली

Mumbai traffic police, returned a bag, Gold and cash

मुंबई, १९ फेब्रुवारी: मुंबई पोलीस हे नेहमीच सक्रीय असतात. मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव आपण अनेकदा ऐकला असेल आता पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला आहे. एक महिला आपली बॅग ऑटो रिक्षात विसरली आणि या बॅगमध्ये तब्बल १३ तोळे सोने आणि काही रोकडही होती. ही बॅग मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शोधून काढली आणि पुन्हा त्या महिलेला परत केली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कार्यानंतर सर्वत्र कौतुक होत आहे.

ANI या न्यूज एजन्सीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटनुसार, एक महिला मुंबईतील रिक्षात आपली बॅग विसरली. आपण बॅग विसरलो असल्याचं त्या महिलेच्या लक्षात आल्यावर तिने याची माहिती पोलिसांना दिली. तसेच बॅगमध्ये काही रोकड आणि लाखोंचे दागिने असल्याची माहितीही या महिलेने पोलिसांना दिली.

ही माहिती मिळातच मुंबई पोलिसांनी सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आणि सीसीटीव्हीच्या मदतीने ऑटो रिक्षाचा क्रमांक मिळवला. यानंतर त्या रिक्षाचालकासोबत संपर्क साधून ती बॅग त्या महिलेला परत मिळवून दिली. पोलिसांनी सांगितले की, एक महिला आपली बॅग ऑटोरिक्षात विसरली होती. आम्ही सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने ऑटो रिक्षाचा नंबर काढला. यानंतर रिक्षा चालकाचा फोन नंबर मिळवला आणि त्याच्याशी संपर्क साधला. मग ही आम्ही त्या महिलेला परत मिळवून दिली. या बॅगमध्ये १३ तोळे सोने आणि काही रोकडही होती.

 

News English Summary: Mumbai Police is always active. You may have heard the glory of the work of Mumbai Police many times, but now it has come to fruition once again. A woman forgot her bag in an auto rickshaw and it contained 13 weights of gold and some cash. The bag was found by the Mumbai Police Traffic Department and returned to the woman. This work done by Mumbai Police is being appreciated everywhere.

News English Title: Mumbai traffic police returned a bag with 13 tola gold and cash to woman news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x