Crime Patrol | भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्याला शिवीगाळ करत मारहाण

मुंबई, ०५ जून | नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो स्वामीत्व पावती नव्हती. त्यामुळे या तपासणी पथकाने २ तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरासह अन्य दोन महिला तलाठी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला.
यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठींमध्ये वाद झाला. यावेळी नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठींसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) corporator Gaurav Chaudhary from Nandurbar has allegedly beaten up women talathis in a sand inspection team appointed by a tehsildar. Corporator Gaurav Chaudhary assaulted Nisha Pavara, a woman talathi in the squad. The incident has caused a stir in the area. Police have registered a case in this regard
News English Title: Nandurbar BJP corporator Gaurav Chaudhari beats up woman officer for blocking sand truck news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON