21 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC
x

नवी मुंबई | गजानन काळेंवर 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

MNS Gajanan Kale

नवी मुंबई, २५ ऑगस्ट | मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. पत्नी संजीवनी काळे यांनी गजानन काळेंविरोधात विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहेत.

नवी मुंबई, गजानन काळेंवर 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश – Navi Mumbai MNS leader Gajanan Kale got relief from Mumbai high court :

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.

नवी मुंबईतील महिलांचा संजीवनी काळेंना पाठिंबा वाढतोय: मनसेची निवडणुकीत अडचण:
मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आहे.

मागील काही दिवसांत हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि इतर पक्षातील महिलांनी संजीवनी काळे यांना पाठिंबा दिलेला असताना दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील महिलांचाही संजीवनी काळे यांना पाठिंबा वाढतोय आणि परिणामी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. कारण अजून पर्यंत मनसे पक्षा विरोधात संजीवनी काळे यांनी कोणताही विधान केलेलं नाही. मात्र भविष्यात मनसेने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर त्या मनसे विरोधात स्टेटमेंट केल्यास ती मनसेची मोठी राजकीय अडचण ठरेल असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Navi Mumbai MNS leader Gajanan Kale got relief from Mumbai high court news updates.

हॅशटॅग्स

#GajananKale(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x