22 November 2024 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान | म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत - राष्ट्रवादी

Parambir Singh

मुंबई, ०८ सप्टेंबर | अँटिलिया प्रकरणात एनआयएने सादर केलेल्या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परामबीर सिंहला वाचवलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना सिंह हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिशाभूल करत होते. सिंह यांना वाचवण्यासाठी भाजपने गृहमंत्र्यांवर आरोप केले. मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे परमबीर सिंह हा या सर्व घटनेचा मास्टरमाईंड आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यात अजून मोठे खुलासे होऊ शकतात. याची चौकशी होणे गरजेचे आहे. सचिन वाझे याला परमबीर सिंह यांनीच अपॉइंट केले होते. तसेच एनआयएकडून काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान, म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत – NCP made serious allegations on BJP after NIA charge sheet filed at court :

यावेळी बोलताना NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी परमबीरसिंग यांनी पैसे दिले होते. त्यांनी 5 लाख रुपये माजी दिले होते, अशी माहिती सायबर एक्स्पर्टने दिली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

तसेच पुढे बोलताना, “NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे यांनी केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान देण्यात आलंय,” असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP made serious allegations on BJP after NIA charge sheet filed at court.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x