15 January 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

संबंधित तरुणी आणि मेहबूब यांचा वर्षभर संपर्कच नाही | पोलिसांची माहिती | राष्ट्रवादी आक्रमक

NCP leader Mahebub Shaikh, MLA Rohit Pawar

मुंबई, ३१ डिसेंबर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महेबूब शेख यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी शेख यांनी संपर्क केला व आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास अधिकार्‍यांकडे केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरापासून कार्यरत असताना वेळोवेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र काही विरोधी राजकीय नेतेमंडळी करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.

दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतरलआता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रथमच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणलीय. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावलं आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे, पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केलाय. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

 

News English Summary: It is clear that the girl and Mahebub were not contacted by the Aurangabad police at a press conference. Since then, young NCP leaders have come out in support of Mahebub. For the first time, NCP MLA Rohit Pawar has given a detailed statement in this regard. According to the police, Mahebub Sheikh has not had any contact with the girl in the last one year. Therefore, the opposition should not take political advantage of this issue, said Rohit Pawar to the Bharatiya Janata Party.

News English Title: NCP Party leaders criticised BJP over fails allegations on Mahebub Shaikh news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x