21 April 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

देशद्रोही अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा | राष्ट्रवादीचं मुंबईत आंदोलन

NCP party protest, Arrest Arnab Goswami

मुंबई, २० जानेवारी: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.

हा देशद्रोहाचा प्रकार आहे असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. सचिन सावंत यांनी काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील अर्णब गोस्वामी विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने थेट आंदोलन करत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने सांगितलं की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसअप संभाषणातून देशातील अनेक संवेदनशील बाबी उघड झाल्या. हा देशद्रोहाचा प्रकार असून अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी माजी आ. विद्या चव्हाण आणि आणि प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

News English Summary: The NCP is also seen attacking Arnab Goswami. Today, the NCP, led by MLA Vidya Chavan, has staged a direct agitation demanding the arrest of Arnab Goswami. In this regard, the NCP said that the WhatsApp conversation of Arnab Goswami, the editor of Republic TV, revealed many sensitive issues in the country. This is a form of treason and Arnab Goswami should be arrested immediately. The agitation was led by Vidya Chavan and State Spokesperson Mahesh Tapase.

News English Title: NCP party protest in Mumbai to arrest Arnab Goswami after military secret action leaked news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या