आर्किटेक्ट निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग | राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई, २४ मार्च: आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या खूनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या नागपुरातील धरपेठ येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला.
दरम्यान, ६ सप्टेंबर २०१६ मध्ये लाल ईमली मार्गावर दुचाकीने ट्रीपल सिट आलेल्या हल्लेखोरांनी एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे होता. परंतु, दोन वर्षांपर्यंत आरोपी न सापडल्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. यादरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या १० वर्षांतील ‘अनडिटेक्ट मर्डर’ फाईल्स उघडल्या होत्या. गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणे सुरू केले. यामध्ये गुन्हे शाखेला छिंदवाडा जेलमधील राजा नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुगावा मिळाला होता. तो धागा धरून गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडाचा छडा लावला. सीबीआय लवकरच अटकेची प्रक्रिया करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावेळी पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते.
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे वर्धा मार्गावर विमानतळाजवळ जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त किमतीची साडेपाच एकर जागा आहे. या जागेवरून हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे मालक अन्नू सिद्दीकी, आतीक सिद्दीकी, पायोनिअर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक अनिल नायर आणि ग्रीन लॅब्रेज नावाच्या कंपनीचे मालक गुप्ता नावाच्या व्यक्तीशी त्यांचा वाद सुरू होता. त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटलाही सुरू होता. त्यामुळे याच जमिनीच्या वादातून रणजित सफेलकर याला सुपारी देण्यात आली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली. मात्र, रणजित सफेलकरच्या अटकेनंतर कारण स्पष्ट होईल, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले होते.
तब्बल पाच वर्षानंतर नागपूरच्या बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला होता. निमगडे खून प्रकरणात नागपूरचा कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा खास सहकारी कालू हाटेचा सहभाग असल्याचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुलासा केला. या प्रकरणात हजारो गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून 9 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत तर 5 जण फरार होते.
नागपुरात 2016 मध्ये आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड घडलं. या हत्याकांडाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर या खुनाच्या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याने नागपूर पोलिसांनी सर्व माहिती सीबीआयच्या पथकाला दिली होती.
News English Summary: NCP leader Devendra Fadnavis was indirectly involved in the murder of architect Eknath Nimgade. The agitation was led by former NCP corporator Ved Prakash Arya at Fadnavis’ residence at Dharpeth in Nagpur on Wednesday morning. The statue of Fadnavis was burnt at this time.
News English Title: NCP protest over Devendra Fadanvis and architect Eknath Nimgade Murder Case Nagpur news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON