13 January 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

New CBI Director | ज्या IPS अधिकाऱ्याला डीके शिवकुमार 'बिनकामाचा' म्हणाले होते, त्यांचीच मोदी सरकारने CBI प्रमुखपदी नेमणूक केली

New CBI Director Praveen Sood

New CBI Director | कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची सीबीआयचे नवे ‘बॉस’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या सीबीआय संचालकपदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांचा कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या सोबत ३६ चा आकडा आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतरच मोदी सरकारने रविवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

डीके शिवकुमार यांनी त्यांना ‘बिनकामाचा’ असे म्हटले होते
शनिवारी सायंकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील विजयाचे मोठे श्रेय डीके शिवकुमार यांना दिले जात आहे. तर दुसरीकडे ते मुख्यमंत्रिपदाचेही दावेदार आहेत. डीके शिवकुमार यांनी एकदा डीजीपी प्रवीण सूद यांना ‘बिनकामाचा’ अधिकारी असे म्हटले होते. कर्नाटकात तीन वर्षे डीजीपी पदावर राहूनही ते भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत आहेत आणि त्यांच्याविरोधात एफआयआर व्हायला हवा अशी मागणी त्यावेळी शिवकुमार यांनी होती.

त्यावेळी शिवकुमार म्हणाले होते की, सूद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे प्रवीण सूदला अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्याच अधिकाऱ्याला कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतरच मोदी सरकारने रविवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केल्याने यामागे मोदी सरकारचा राजकीय कु-हेतू असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अधीर रंजन यांनी नियुक्तीला विरोध केला होता
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सूद यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. सूद आता दोन वर्षे या पदावर राहणार आहेत. ते सीबीआय संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची जागा घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अधीर रंजन चौधरी यांनी सूद यांच्या नियुक्तीला विरोध केला होता आणि ते या पदावर काम करू शकतील अशा आयपीएस अधिकाऱ्यांच्या गटाचा भाग नसल्याचे सांगितले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: New CBI Director Praveen Sood Vs DK Shivkumar check details on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#New CBI Director Praveen Sood(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x