14 January 2025 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

पब्लिसीटीसाठी सचिन वाझेंनी संपूर्ण कट आखल्याची NIA'कडे कबुली

NIA, Sachin Vaze

मुंबई, १८ मार्च: NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.

NIA च्या अधिकाऱ्यांना वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक शर्ट जप्त केला आहे. हे दोन्ही शर्ट गुन्ह्यात वापरले होते. त्यातला एक सदरा मुलुंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. त्याच ठिकाणी काल वाझे यांना घेऊन एनआयए अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याशिवाय NIA ने काल रात्री सचिन वाझेंच्या घराच्या कंपाऊंडमधून एक कार जप्त केली. या कारमध्ये महत्वाचे पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. NIA कडून आणखी दोन कारचा शोध सुरु आहे.

सचिन वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची NIA सूत्रांची माहिती आहे. हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची माहिती सचिन वाझेंनी NIA ला दिली होती. मात्र एनआयए सखोल तपास करत आहे.

 

News English Summary: The NIA on Wednesday night took suspended police officer (API) Sachin Waze to Thane. Scene recreation was done in many places there. Late at night, two NIA teams raided Vazen’s home. A number of documents have been seized in this regard. People from his society were also questioned.

News English Title: NIA got important information from Sachin Vaze during deep enquiry news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x