मनसुख प्रकरणाआडून मुंबई पोलिसच रडारवर? | अजून काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता
मुंबई, १४ मार्च: मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.
अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी एनआयकडून केली जाणार आहे.
अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा असल्याचं ANI चं म्हणणं आहे. मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.
स्कॉर्पिओ ठेवून दुसऱ्या इनोव्हातून आलेल्या चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी एनआयएच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. पोलीस अधिकारीही रडारवर असल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
News English Summary: Another driver is likely to be arrested, along with a driver from another Innova and another man with a Scorpio. For this, three teams of NIA have been dispatched. There is a stir in the Commissionerate of Police as police officers are also on the radar.
News English Title: NIA may arrest few more Mumbai Police officers in Mansukh Hiren case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल