21 April 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

सचिन वाझे तर निमित्त | DIG दर्जा असलेले एक मोठे अधिकारी NIA चौकशीच्या रडारवर?

Sachin Vaze, Mumbai Police, NIA

मुंबई, १५ मार्च: NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आता NIA ने या बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी एनआयएच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, NIA चे तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.

त्यामुळे आता NIA या बड्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. त्यामुळे NIA कडून आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

News English Summary: The NIA will soon arrest and interrogate the two drivers. On the other hand, sources said that Sachin Vaze had named a senior Mumbai police officer during the NIA probe. So now more shocking information in this case is likely to come to light.

News English Title: NIA may call Mumbai Police DIG level office for enquiry news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या