सचिन वाझे NIA'च्या कस्टडीत असताना हे पत्र मीडियात कसे लीक झाले? | कोर्टात प्रश्न
मुंबई, ९ एप्रिल: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) सध्या अँटिलिया स्फोटक जप्ती प्रकरण आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्र ATS ने हिरेनच्या हत्येचा तपास सुरू केला आणि माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी राजेश गोरे यांना अटक केली. सचिन वाझे 9 एप्रिलपर्यंत NIA ताब्यात आहेत. त्यानंतर आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सचिन वाझे यांनी नुकतेच एक पत्र लिहून शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि अन्य नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. हे पत्र सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिल्याची चर्चा होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी NIA कडून कोर्टात वेगळाच दावा करण्यात आला.
सचिन वाझे यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल विचार NIA ने आक्षेप नोंदवला. सचिन वाझे हे आमच्या कस्टडीत होते. इतर तपास यंत्रणांना या पत्राची माहिती नव्हती. मग तरीदेखील हे पत्र मीडियात कसे लीक झाले, असा सवाल NIAच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर न्यायाधीशांनी सचिन वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले. त्यावर असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी ताकीद न्यायाधीशांनी दिल्याचे समजते.
News English Summary: Sachin Waze had recently written a letter making serious allegations against Shiv Sena minister Anil Parab and other leaders. It was rumored that the letter was handed over by Sachin Waze to the National Investigation Agency (NIA). After that, there was a great stir in the political circles. Against the backdrop of all these developments, a separate claim was filed in court by the NIA on Friday.
News English Title: NIA raised question in court over leaked letter of Sachin Vaze in Media news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS