23 February 2025 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबई भाजपचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक | भाजपचा हा संघजिहाद आहे का? - काँग्रेस

Office bearer, BJP's minority cell, Bangladeshi, Sachin Sawant

मुंबई, २० फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले आहेत, तर काही जण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे एजंटही निघाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भारतीय जनता पक्षाचा हा संघजिहाद आहे का?,’ असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

एक व्हिडिओ ट्वीट करून सचिन सावंत यांनी या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेला रुबेल शेख अवैध कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत होता. शेख भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली. त्याचं वय २४ वर्ष आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. हा भारतीय जनता पक्षाचा संघ जिहाद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सचिन सावंत यांचे हे आरोप भारतीय जनता पक्षानं फेटाळून लावले असून सावंत यांनाच प्रतिप्रश्न केला आहे. ‘सचिन सावंत हे केवळ प्रसिद्धीसाठी वायफळ आरोप करत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या आहेत हे आम्ही विचारणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता बांगलादेशी नाही. पोलिसांकडे कागदपत्र असतील तर त्यांनी कारवाई करावी,’ असं भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Some Bharatiya Janata Party (BJP) functionaries have been caught smuggling cow dung, while others have been identified as agents of the Pakistani spy agency ISI. Now the office bearer of the BJP’s minority cell in Mumbai has been found to be a Bangladeshi national. Is this Sangh Jihad of Bharatiya Janata Party ?, ‘asked Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant.

News English Title: Office bearer of the BJP’s minority cell in Mumbai has been found to be a Bangladeshi national said congress spokesperson Sachin Sawant news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x