14 January 2025 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

दीपाली चव्हाणने खा. नवनीत राणांना अत्याचाराचं रेकॉडिंग ऐकवलं होतं | पण त्यांनी दुर्लक्ष केलं?

Officer Deepali Chavan, Suicide, MP Navneet Rana

अमरावती, २६ मार्च: मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल (२५ मार्च) सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती दिली आहे. दरम्यान वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले.

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

विशेष म्हणजे नवनीत कौर राणा या भाजप समर्थक म्हणून परिचित आहेत. मात्र दीपाली चव्हाणच्या सुसाईड नोटमध्ये थेट नवनीत चव्हाण यांचा उल्लेख आहे आणि त्या अमरावतीच्या लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना देखील भेटून दीपाली यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं रेकॉर्डिंग ऐकवलं होतं. मात्र त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याचं समजतं. मात्र भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयात त्यांचा उल्लेख देखील केला नसल्याचं दिसतंय. मात्र शासन आणि प्रशासनाला दोष देण्यासाठी पूर्ण जोर लावल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.

 

News English Summary: After the suicide of Deepali Chavan, BJP leaders have started targeting the Thackeray government. Against this backdrop, Rupali Chakankar has caught Navneet Rana in the act by giving evidence of information in Deepali Chavan’s suicide note. Rupali Chakankar questioned whether MP Navneet Rana, who ignored the complaint, was indirectly involved in the murder.

News English Title: Officer Deepali Chavan has shown recording to MP Navneet Rana bur still she was ignored news updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x