महत्वाच्या बातम्या
-
दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी हडपले | शिल्पा शेट्टी व तिच्या आई विरुद्ध FIR दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्सना चौहान असे त्या महिलेचे नाव असून तिने दिव्य मराठीशी बोलताना आपबिती मांडली आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत
पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज कुंद्राची अटक योग्यच | मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
न्यायमुर्ती मृत्यू प्रकरण | न्यायाधीशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि असहकार्य करणाऱ्या CBI'ला सुप्रीम कोर्टाची नोटीस
धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय
एकीकडे संसदेत पेगासस प्रकरणावरुन गदारोळ सुर आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित 9 अर्जांवर सुनावणी करीत आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. सुनावणीदरम्यान, जर हे रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा आहे असे न्यायमूर्ती एन. व्ही. रमना यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम हेरगिरीचा अहवाल 2019 मध्ये समोर आला होता.
4 वर्षांपूर्वी -
खंडणी प्रकरण | परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू | हायकोर्टात धाव
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तासह 28 जणांविरोधात ठाणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर खंडणीच्या पैशाचे रॅकेट चालवण्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाविरोधात परमबीर सिंह यांची मुंबई हायकोर्टात याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली | एनआयची कोर्टात माहिती
अँटिलिया बाहेरील स्फोटकासह सापडलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून(एनआयए) सुरू आहे. या प्रकरणाशी निगडीत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयने एक नवीन धक्कादायक खुलासा कोर्टात केला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका आरोपीला तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती एनआयएने न्यायलायत दिली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी तीस दिवसांची वेळ मागितली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वसुली प्रकरण आणि परमबीर सिंग | डॉन छोटा शकीलचं नाव देखील चौकशी फेऱ्यात
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली प्रकरणात दाऊद इब्राहिमचा अँगल जोडला गेला आहे. मुंबई पोलीस आता 2016 च्या एका अशा ऑडिओची पुन्हा तपासणी करत आहेत ज्याच्या आधारे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या काळात कारवाई करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
वाहनांच्या आड कपल्सचे अश्लील चाळे | कॉलनीला लावावे लागले 'नो किसिंग झोन'चे फलक
मुंबईतील एका सोसायटीमध्ये पेन्ट करण्यात आलेले फलक सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी एका सोसायटीतील लोकांनी आपल्या पार्किंगच्या जागी ‘NO KISSING ZONE’ (नो किसिंग झोन) असे ठळक अक्षरांमध्ये पेन्ट केले आहे. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या प्रेमी युगुलांमुळे ते कंटाळले होते. लॉकडाउनच्या काळापासूनच या ठिकाणी कपल्स येण्यास सुरुवात झाली होती. त्यांना थांबवण्यासाठी सोसायटीने हा प्रयत्न केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जय शहांकडून मला धमकी | क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप | खेळात राजकीय अजेंड्याचाही आरोप
बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? | हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापले
पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम वाद पेटला | मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा, IG, DIG यांच्यावरही FIR
ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादात मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यतिरिक्त, 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आसामच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी | मनसेकडून डायरेक्टरला फटक्यांची माळ
एका अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्याअभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती.
4 वर्षांपूर्वी -
विरारमध्ये ICICI बँकेच्या माजी मॅनेजरकडून बँक लुटण्यासाठी हल्ला | हल्ल्यात महिला मॅनेजरचा मृत्यू
विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. याला विरोध करताना बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मॅनेजर योगीता वर्तक यांचा मृत्यू झाला असून, कॅशियर श्वेता देवरूख जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी कॅशियरवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पारनेर तालुकाध्यक्षाच्या पत्नीला खंडणी प्रकरणी अटक
एकाबाजूला पक्षातील वरिष्ठ आगामी महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकीत व्यस्त आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसेच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोर्नोग्राफी प्रकरण | त्यांनी व्हॉट्सअॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले होते - मॉडेल झोया राठोड
पोर्नोग्राफी तयार करून ते काही ऍपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. काल राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले | रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल