महत्वाच्या बातम्या
-
परमबीर सिंग आणि सचिन वाझेच वसुली गॅंग चालवत होते का? | प्रसिद्ध कार डिझायनर छाबरियांचाही आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा दावाही छाबरिया यांनी केला आहे. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मंत्र्यांवर आरोप करायचे, मग राज्य सरकार काही करणार नाही असे भासवायचे, मग हायकोर्टामार्फत CBI चौकशीची मागणी करायची
नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उत्तर प्रदेशातील रायबरेलीत अधिक पैसे घेऊन भिंतीतून दारू विक्री होतेय
देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ११ हजार २९८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरून गेले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | 'पतंजलि' भेसळयुक्त खाद्यतेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या धाडीनंतर कारखाना सील
एकीकडे भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) गुरुवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली. अॅलोपथीबाबत अप्रामाणिक आणि चुकीचे विचार मांडल्याबद्दल बाबांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणीही करण्यात आली आहे. रामदेव बाबा यांनी प्रस्थापित आणि मान्यताप्राप्त पद्धत आणि औषधांबाबत जाणीवपूर्वक चुकीची, निराधार माहिती पसरवली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पैलवान सागर मर्डर केस | सुशील कुमारचा छत्रसाल स्टेडिअममधील मारहाणीचा VIDEO आला समोर
छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवकाचा पराक्रम, बनावट कागदपत्रांनी नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन विक्री
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे आणि त्याला कारण ठरला आहे पिंपरीतील भाजप नगरसेवक. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा ठपका लांडगेंवर ठेवण्यात आला आहे. लांडगेंसह एका जमीन खरेदीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकाचा शोध सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक रॅलीत सहभागी झालेल्या अमित शहांविरोधात FIR का नोंदवला गेला नाही? - कर्नाटक हायकोर्ट
देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना दुसऱ्याबाजूला ५ राज्यांतील विधानसभा आणि काही ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅली आणि सभांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे समोर आले. यावरून कर्नाटक हायकोर्टाने बेळगाव पोलिसांना धारेवर धरले असून, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात FIR का नोंदवला नाही, अशी विचारणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या टीमने रश्मी शुक्लांचा हैदराबादेतील निवासस्थानी जबाब नोंदवला
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्यावर 24 मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये - मुंबई हायकोर्ट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मयुरेश राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल
बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. आता या सर्वांना कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात
प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांची तीन स्वतंत्र तक्रारींवर ‘एसीबी’कडून गोपनीय चौकशी सुरु
विवादित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. ही समिती नेमल्यानंतर विरोधकांनी या समितीला कोणतेही अधिकार नसल्याचे सांगत अनिल देशमुख यांची चौकशी निव्वळ फार्स असल्याचे म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय
महाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉन अभी जिंदा है! छोटा राजनच्या मृत्यूची अफवा
दरम्यान, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर यांनी 2018 मध्ये माझ्याकडून 3 कोटी 45 लाखाची खंडणी उकळलेली, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरच आता खंडणी म्हणजे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अजब | चौकशीला हजर न होताच चौकशी अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप करत रश्मी शुक्ला हायकोर्टात
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस महासंचालकांना भेटले 19 एप्रिलला | गुन्हा दाखल होताच सिंग यांचे २९ एप्रिलला पुन्हा आरोप करत याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसंच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. उच्च न्यायालयात ४ मे रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या