महत्वाच्या बातम्या
-
ATS'ने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? | मनिष भतिजा फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर
अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथका (ATS)ने दमणमधून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
API दर्जाच्या अधिकाऱ्याला कोणी १०० कोटी रुपयांचं टार्गेट देईल हेच मनाला पटत नाही - IPS कृष्ण प्रकाश
महाराष्ट्राचे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असून चुकीला माफी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
ATS ला संशय | वाझेंनी स्फोटकांच्या कटात मनसुख यांचाही समावेश केला होता | रहस्य उघड होण्याच्या भीतीने?
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण सोडवल्याचा दावा करत दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एक मुंबई पोलिसांचा निलंबित कॉन्स्टेबल आहे तर दुसरा क्रिकेट बुकी आहे. कोर्टाने या दोघांना 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासात एटीएस सचिन वाझे यांना या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | त्या प्रकरणातही झाला होता १०० कोटीची लाच देण्याचा आरोप | पण कोणावर? - सविस्तर
साधारण ५-६ वर्षांपूर्वी न्यायमूर्ती लोया यांच्या अकस्मात मृत्यूने देशात मोठं राजकीय वादळ उठलं होतं. तत्कालीन सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती लोया यांच्याकडेच होती, ज्यामध्ये भाजपा प्रमुख नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्य आरोपी होते. त्यावेळी न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया यांनी “अनुकूल” निर्णय द्यावा यासाठी तब्बल 100 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोडवरील जागा गुंडांमार्फत बळकावण्याचा प्रयत्न
रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोड येथील रमेश सिंग या जागेचे ताबा असलेल्या मालकाची जागा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढे करून हडपण्याचा प्रकार खुलेआम सुरु असल्याचं वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये राजकीय लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने अंधेरी पूर्वेकडील स्थानिक MIDC पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका राजकीय लोकप्रनिधीचा या जागेवर डोळा असल्याने जागेचे ताबा मालक रमेश सिंग यांना गुंडांच्या मार्फत घाबरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याच जागेत गुंडांना घुसवून जागा खाली करण्याच्या धमक्या दिल्या जातं आहेत आणि त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIAकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या परिसरात अजून एक मृतदेह | योगायोगाची शक्यता अधिक
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. आता त्याच परिसरात आणखी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीत 200 जिलेटिन कांड्या आणि 200 डेटोनेटर सापडले | NIA रस घेण्याची शक्यता कमीच
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 20 जिलेटिन कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत याप्रकरणात NIA ला जवाबदारी दिली. विषय थेट अंबानींशी निगडित असल्याने मोदी सरकार देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं आणि NIA ने देखील एखाद्या विषयात सुपरसॉनिक ऐतिहासिक वेगाने कारवाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | हॉटेलमध्ये तंंदूर रोटी बनवताना किळसवाणा प्रकार
दिल्लीमधील ख्याला भागातील चांद हॉटेलमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये चांद हॉटेलमध्ये दोघे भट्टीवर तंदूर रोटी बनवत आहेत. परंतु, यावेळी यातील एकजण तंदूर रोटी तयार करुन झाल्यानंतर तिला भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंतोय. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाराची गंभीरपणे दखल घेत हॉटेलमधील दोन्ही आरोपींना तब्यात घेतले.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंनी अनेक पुरावे नष्ट केल्याने NIA'च्या अडचणीत वाढ
मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पब्लिसीटीसाठी सचिन वाझेंनी संपूर्ण कट आखल्याची NIA'कडे कबुली
NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरण | NIA सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात ‘कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली असून नगराळे यांनी सायंकाळी तत्काळ मुंबई पोलिस अायुक्तपदाचा पदभारही स्वीकारला.
4 वर्षांपूर्वी -
जमिनीवरील तपासापासून ते खाडीच्या पाण्याखाली काय घडलं | फडणवीसांकडून खुलासा | काँग्रेसचा हा सल्ला
महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत का घेण्यात आलं, असा सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी - अविनाश जाधव
सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची असून ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती आॅनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान याच विषयात आता राजकीय नेत्यांचे धक्कादायक दावे देखील समोर येऊ लागले आहेत. तसाच एक धक्कादायक दावा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तयार होत नाहीत | हे व्यक्तिगत फायद्यासाठी
सचिन वाझे प्रकरणावरून सध्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवण्याची मागणी होतं आहे. यातच अनुभवी निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी या प्रकरणावर फेसबुक सविस्तर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी चित्र स्पष्ट केलं असताना सचिन वाझे यांचंच हे व्यक्तिगत हितासाठी रचलेलं षडयंत्र आहे असं अप्रत्यक्षरीत्या म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
धक्कादायक | NIA'ने जप्त केलेली मर्सिडीज | भाजप नेत्याचं कनेक्शन आणि गाडीसोबत फोटो
मनसुख हिरेन आणि स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
CDR चा स्त्रोत आणि CDR स्वतः कडे ठेवून फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत - काँग्रेस
राज्य संकल्पिय अधिवेशनात फडणवीसांनी स्वतःलाच गोत्यात आणलं आहे असंच म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी देखील याची आठवण त्यांना विधिमंडळातच करून दिली होती. मात्र, त्यानंतर देखील ते माझ्यावर कारवाई करा असं तावातावाणे बोलून गेले खरे, मात्र आता राजकीय अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने ते थेट न्यायालयाचा दाखल देत फडणवीसांना सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे प्रकरण | ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकांचा धडाका | दोषींवर कारवाई होणार
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंहच कायम राहणार आहेत. अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीत परमबीर सिंह यांची जागा कायम राहणार असल्याचं ठरलं, असं बोललं जातं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
गोध्रा दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट देणारे आणि सध्याचे NIA डीजी वाय. सी. मोदी मुंबईत
कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये मुंबईच्या सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाची देखील एनआयएकडून चौकशी सुरू असून सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझेंवर परमबीर सिंग आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा दावा करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सँडविच खाण्यावरून ATS अधिकाऱ्याशी वाद | ATS Vs क्राईम ब्रांच वादात विरोधक आणि NIA'ला इनपुट दिलं?
सध्या समोर येतं असलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल. अटक होण्याच्या अनेक दिवस आधी सचिन वाझे यांनी मला माझे सहकारीच अडकवू इच्छित आहेत असं व्हाट्सअँप स्टेटस ठेवलं होतं. विशेष म्हणजे अधिवेशन काळात विरोधकांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पोलीस खात्यातील दोन भिन्न विभागात पेटलेल्या अघोषित वादात काही माहिती गुप्त पद्धतीने पुरावली गेल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पोलीस खात्यातील काही लोकं फडणवीसांना माहिती देत असल्याचा आरोप करताना राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र हा वाद ATS अधिकारी आणि क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांमधील अहंकारातून पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL