महत्वाच्या बातम्या
-
Pooja Chavan Post Mortem Report | पूजा मृत्यू प्रकरणी विरोधक तोंडघशी पडण्याची शक्यता
एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | मतिमंद मुलीने 33 वर्षीय महिलेला गॅलरीतून ढकलून दिले | घटना CCTV'त कैद
पुण्यातील कोथरुडमधून अत्यंत भीषण घटना घडली आहे. एका मानसिकदृष्ट्या आजारी अल्पवयीन मुलीने (वय वर्षे 14) मानसिकदृष्ट्या आजारी महिलेला (वय वर्ष 33) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पूजा नंतर पूजाच्या पालकांची कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी सुरु | हे षडयंत्र?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण | चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची वारंवार मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास करत नाहीत | अशा प्रकरणांमध्ये गुन्हा मानूनच तपास करतात
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
खा. मोहन डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव | राज्य सरकार चौकशी करणार
दोन दिवसांपूर्वी दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. यासोबतच पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे
4 वर्षांपूर्वी -
तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स | पुण्यातील घटना
तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारच्या धोरणांशी सहमत नाही म्हणून नागरिकांना तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही - न्यायालय
शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात अखेर दिशा रवीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या 9 दिवसांपासून कारागृहात राहिलेल्या दिशाला दिल्लीच्या पतियाळा येथील हाउसकोर्टाकडून एक लाखाच्या खासगी जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याच प्रकरणातील आणखी एक सह-आरोपी शांतनू मुलुकने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | फक्त एक प्लेट भेळीपुरीसाठी दोन गटात तुफान हाणामारी
समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मिडिया असे माध्यम आहे ज्यावर फोटो, व्हिडिओ शेअर करत अनेकजण प्रसिद्धी मिळवतात. देशातील घडलेल्या घटनांवर मोठमोठे व्यक्ती आपली प्रतिक्रिया देत असतात. असाच एक हाणामारीचा व्हिडिओ अभिनेत्री रिचा चड्डा हीने सोशल मिडियावर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या नव्या फोटोने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.
4 वर्षांपूर्वी -
खा. मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू | मुंबईतील हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू झाला आहे. ते 58 वर्षांचे होते. मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असावी असे सांगितले जात आहे. परंतू, पोलीस मात्र अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं | पामेलाच्या वडिलांचा आरोप
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी लाखो रूपयांच ड्रग्ज घेऊन जाताना अटक केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टिका करत पामेला गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वांद्र्यातील 5 पबमध्ये बीएमसीची छापेमारी | ग्राहकांना मास्क घालण्याच्या सूचना देऊन सोडले
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहनमुंबई महापालिकेची धडक कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरातील 5 पबवर BMC च्या आधिकाऱ्यांनी छापेमारी केली, यावेळी अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टिसिंग सारख्या नियमांचे पालन केलेले दिसले नाही. यानंतर आधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचा इशारा देऊन सोडून दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुलीने लग्नाला दिला नकार | म्हणून मुलाने धावत्या रेल्वेतून ढकलण्याचा केला प्रयत्न
प्रेमात अपयशी ठरलेल्या सुमेध जाधव या मुलाने 21 वर्षाच्या मैत्रिणीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. पण अयशस्वी झाल्याने तो पळून गेला. परंतु, थोड्या वेळाने रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडले. ही घटना मुंबईतील खार रेल्वे स्टेशनची आहे. स्टेशन प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना टिपण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई भाजपचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक | भाजपचा हा संघजिहाद आहे का? - काँग्रेस
भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले आहेत, तर काही जण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे एजंटही निघाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भारतीय जनता पक्षाचा हा संघजिहाद आहे का?,’ असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजप महिला पदाधिकारी पामेला गोस्वामींना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक
भाजप पश्चिम बंगालच्या युवा संघटनेच्या महिला पदाधिकारी पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी दक्षिण कोलकाता येथील न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली. त्या कोकेन बाळगत असल्याचा कोलकत्ता पोलिसांना संशय होता आणि त्याच कारणाने पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत त्यांच्याकडे कोकेन आढळल्याने अखेर पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बागेत १३ तोळे सोनं व रोकड | रिक्षात विसरलेली बॅग मुंबई पोलिसांनी काही वेळात मिळवून दिली
मुंबई पोलीस हे नेहमीच सक्रीय असतात. मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव आपण अनेकदा ऐकला असेल आता पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला आहे. एक महिला आपली बॅग ऑटो रिक्षात विसरली आणि या बॅगमध्ये तब्बल १३ तोळे सोने आणि काही रोकडही होती. ही बॅग मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शोधून काढली आणि पुन्हा त्या महिलेला परत केली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कार्यानंतर सर्वत्र कौतुक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कपड्यावरून स्तनांना स्पर्श करणं लैंगिक शोषण नाही | त्या निकालवरून महिलेने जजला पाठवले कंडोम
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा व्ही. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीच्या कपड्यावरून तीच्या स्तनांना स्पर्श करणे हे पॉक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण नाही, असा अजब निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली. न्यायाधिशांच्या या निर्णयावर नाराज होऊन गुजरातच्या देवश्री त्रिवेदी या महिलेने त्यांना १५० कंडोम पाठवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दहशतवाद्याचा भरबाजारात गोळीबार | दोन जवान शहीद | ३ दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरच्या शोपियांमध्ये गुरुवारी रात्री सुरक्षादलाने काही दहशतवाद्यांना घेरले. सकाळपर्यंत सुरू असलेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दुसरीकडे बडगाममध्ये एन्काउंटर दरम्यान एक SPO शहीद झाले आहेत. येथे शुक्रवारी सकाळी जवळपास 6 वाजता सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
भंडारा आग प्रकरण | 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल | हे आहे कारण....
9 जानेवारीला भंडारा जिल्हा हॉस्पिटलच्या न्यूबॉर्न केअर यूनिटमध्ये आग लागली होती. यात झालेल्या 10 नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये नर्स शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके यांच्या विरोधात IPC च्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल