महत्वाच्या बातम्या
-
प. बंगाल निवडणुकीपूर्वी CBI कामाला लागली | घोटाळा प्रकरणी TMC नेत्यांच्या घरी छापेमारी
पश्चिम बंगालमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेंट्रल इंवेस्टिगेशन ब्यूरो (CBI) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी CBI ने कोळसा घोटाळा प्रकरणात बंगालच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकातामध्ये 13 ठिकाणांवर छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा, व्यवसायी अमित सिंह आणि नीरज सिंहच्या ठिकाणांवर झाली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या काळात मला अडकवण्यासाठी बँकेची चौकशी लावली | पण सत्य उजेडात आलं
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 6६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. चौकशी अहवालात अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert Fake FASTag | फास्टॅगच्या फसवणुकीबाबत NHAI'चा अलर्ट | कुठे खरेदी कराल
भारत सरकारने टोल टॅक्ससाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. जर आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर आपल्या कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला टोल भरण्यात अडचण येऊ शकते. फास्टॅगच्या अनिवार्यतेमुळे त्याची विक्रीदेखील लक्षणीय वाढली आहे आणि यामुळेच त्याबाबत होणारी फसवणूक देखील वाढत आहे. म्हणूनच फास्टॅग घेताना सतर्क राहणे आवश्यक आहे. एनएचएआय (NHAI) अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही बनावट फास्टॅगच्या वाढत्या प्रकरणाबाबत अलर्ट जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे पोलिसांची मोठी कारवाई | अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं | शेतात बेशुद्ध अवस्थेत ३ मुली आढळल्या | दोघींचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगायोग? पूजाने ३ वर्ष भाजपसाठी काम | तर मृत्यूदिवशी इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवक
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
यवतमाळमध्ये एका मुलीचा गर्भपात | कागदोपत्री नाव श्रीमती पूजा अरुण राठोड..ती नेमकी कोण?
बीडची टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तूर्तास अभय मिळाल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळपासूनच माध्यमांमध्ये राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारित केले जात होते. परंतु राठोड यांचा राजीनामा घेण्याचा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोणताही विचार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
तृतीयपंथीयांचा रस्त्यावर धुडगूस | वाहतूक पोलिसाला मारहाण | पोलिसांकडून अटक
मुंबईत रहदारीच्या ठिकाणी धुडगूस घालण्याचे प्रकार काही जुने राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्राफिक पोलिसांच्या कॉलरला धरून त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या महिलेला चांगलीच अद्दल घडवली होती.
4 वर्षांपूर्वी -
अटक झालेला भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष बांगलादेशी | राष्ट्रवादीचं भाजपवर टीकास्त्र
मालवणी पोलीस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने मालाड मालवणीच्या आंबोजवाडी, आंबेडक चौक, गेट नं. 8 येथे धाड टाकून रुबेल जोनू शेख या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तो बांग्लादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे तो भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवकचा अध्यक्ष आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणला इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवकही | अजून चौकशी बाकी
परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाचा राजीनामा
परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कुख्यात गुंडाची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक | सोबत ३०० गाड्यांचा ताफा
कूविख्यात गजानन मारणे याची 2 खुनातून निर्देश मुक्तता झाल्यानंतर त्याची काल तळोजा कारागृहातून सुटका झाली. यानंतर महाराष्ट्राचा ‘किंग’ असे स्टेटस टाकत चाहत्यांनी त्याची महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली. पुण्यात त्याने ‘रॉयल इंट्री’ तर केलीच पण त्याच्या या गाड्यांचा ताफा पाहून चांगलीच खळबळ उडाली होती. एकीकडे ‘मोहोळ’ने जेलबाहेर पडल्यानंतर शहरात एका कार्यक्रमाला आणि इतर ठिकाणी हजेरी लावत ताकत दाखवली आणि दुसरीकडे गजानन मारणे याने इंट्रीच रॉयल केल्याने पोलिसांच्या डोकेदुखी वाढली होती.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणी आणि सोशल मीडियावरील न्यायाधीश लोकांनो थोबाड बंद करावे - रुपाली पाटील
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणची हत्या नाही | तर पूर्णपणे आत्महत्या आहे - धनंजय मुंडे
मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव गोवण्यात आल्यानं अनेक राजकीय पडसादही उमटत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चुकूनही स्कॅन करू नका QR Code | अन्यथा तुमचं अकाऊंट रिकामं होईल
अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
भारतरत्नांची नव्हे | भाजप IT सेलची चौकशी होणार | IT सेलच्या प्रमुखाचंही नाव समोर - गृहमंत्री
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला.
4 वर्षांपूर्वी -
पूजा आणि अरूण वर्गमित्र होते | पण क्लिपमधील आवाज अरूणचा नाही | ग्रामस्थांचा दावा
परळी येथील मूळ रहिवासी युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण लक्षपूर्वक पाहिले तर यात आतापर्यंत बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. त्यानंतर तिचे कुटुंबीय पुढे येऊ लागल्याने वास्तव समोर येण्यास सुरुवात झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरतेय म्हणजे भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली | पोलीस जबाबात माहिती
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी | विरोधकांनाही समाजाची बदनामी थांबविण्याचा इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today