महत्वाच्या बातम्या
-
Sameer Wankhede Fletcher Patel Connection | ३ केसेसमध्ये फॅमिली फ्रेंड फ्लेचर पटेल पंच? | वानखेडेंभोवती संशयाचे धुके गडद
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे पोलखोल केल्याने समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध संशयाचे धुके अजून गडद (Sameer Wankhede Fletcher Patel Connection) होताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Jitendra Awhad Arrested | अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन
इंजिनियर अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या ट्विटरवरून दिली आहे. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टाने जामीन देखील मंजूर केल्याचं (Jitendra Awhad Arrested) ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail | कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवल्याने आर्यनचा कोठडीतच मुक्काम
मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्ट कोठडीत अडकलेल्या आर्यन खान सह इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पार पडली. परंतु, कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल (Aryan Khan Bail) राखून ठेवल्याने खान कुटुंबियांना पुन्हा धक्का बसला आहे. जवळपास आठवड्याभरावर म्हणजे 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देणार असल्याने आर्यन खानचा मुक्काम अजून वाढला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB | NCB कोर्टात तोंडघशी | नवाब मलिकांच्या जावयाला जामीन मंजूर | NCB'च्या पुरावात ड्रग्सची पुष्टी नाही
मुंबई अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आज जामीन (Mumbai NCB) मंजूर केला. सदर प्रकरणात समीर खान, राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने त्यांच्यावर औषधांचा साठा, विक्री आणि खरेदी केल्याचा गंभीर आरोप ठेवला होता.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | फरार परमबीर सिंग यांच्याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित बनावट सातबारा उतारे सुद्धा सरकारी कचेरीतून फरार
फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेच्या एकेक सुरस कथा बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे. पुनमियाने सिन्नरमध्ये जमीन खरेदीसाठी (Parambir Singh) वापरलेला बनावट सातबारा उताराच आता सरकारी कचेरीतून गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाणी किती खोलवर मुरले आहे, ते समोर येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pune Minor Girl Murder | पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलीची नात्यातील व्यक्तीकडून क्रूर हत्या
पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे (Pune Minor Girl Murder) धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh’s Huge Property in Nashik | परमबीर सिंग यांची सह आरोपींच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी?
शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भोवतीचा संशय वाढत चालला आहे. ते पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर चौकशी तपासासाठी (Parambir Singh’s Huge Property in Nashik) हजर राहत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मंत्रिपुत्राला ३ दिवसांची पोलीस कोठडी
यूपीतील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने आशिषला (Lakhimpur Kheri Violence) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलं विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh Vs CBI | अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट
आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध अटक वॉरंट (Anil Deshmukh Vs CBI) घेऊन आलेले आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयचं पथक अटक वॉरंट संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Crime Branch Notice To Parambir Singh | परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने धाडली नोटीस
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर (Crime Branch Notice To Parambir Singh) राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
NCB Press Conference | सोडण्यात आलेल्यांबद्दलच्या प्रश्नात धर्म-जात हेतूच नव्हता | अधिकाऱ्याच्या उत्तरात 'राजकीय' कला
एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबतची माहिती (NCB Press Conference) दिली. आम्ही 8 लोकांना पकडलं आणि तिघांना सोडलं असं सांगितलं जात होतं. पण आम्ही 6 लोकांना सोडलं आहे. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही जात, धर्म, पक्ष पाहून काम करत नाही. पुराव्याच्या आधारे आम्ही काम करतो. न्यायालयाच्या सुपरव्हिजनमध्ये काम करतो, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
3 वर्षांपूर्वी -
NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी
ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB officer Molestation Case | मुंबई NCB अधिकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग | गुन्हा दाखल
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात नॉक्टोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Mumbai NCB officer molestation Case) झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही 25 वर्षाची असून ती हैदराबाद ते पुणे प्रवास करत होती.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे यूपी सरकारवर मंत्र्याच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला
लखीमपूर खिरीत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यू प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) सुप्रीम कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिषच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आशिषच्या घरावर नोटीस चिकटवून शुक्रवारी सकाळपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याआधी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडेय यांना अटक केली, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
NCB and Criminal Gosavi | फसवणूक, धमकी देणे असे ३ गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार NCB सोबत कारवाईत सामील
गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा (NCB and Criminal Gosavi) एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
Arbaaz Merchant Alleges NCB | NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवली | CCTV'त दिसेल | अरबाझचा आरोप
ड्रग्ज पार्टीचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतं आहे. मुंबईतल्या क्रूझवर टाकण्यात आलेल्या NCB च्या छाप्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट या दोघांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अशात आता अरबाझ मर्चंट याने जामिनासाठी अर्ज केला असून एनसीबीनेच क्रूझवर ड्रग्ज ठेवले असा (Arbaaz Merchant Alleges NCB) आरोप केला आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यात ही बाब दिसून येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail Hearing | आर्यनसह ६ जणांना १४ दिवसांची कोर्ट कोठडी | जामिनासाठी अर्ज करू शकतात
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला आज पुन्हा होणार होता. मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात (Aryan Khan Bail Hearing) आली होती.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | लेखी, कायदेशीर कारवाई करणाऱ्या वानखेडेंना अटक केलेल्यांचा खात्रीलायक आकडाच माहित नाही
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (Sameer Wankhede) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
NCB and BJP | पण NCB प्रमुख म्हणालेले कारवाई 'विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे' | मुंबई NCB कोणाचा बचाव करतंय?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB and BJP) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन येतात हे कोणत्या नियमात बसतं ते सांगणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
NCB Press Conference | साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन गेले? | NCB कोर्टात फसणार?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB On BJP Connection Allegations) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL