महत्वाच्या बातम्या
-
लखोबा लोखंडे फेसबुक पेजवरून मविआ नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण | चॅलेंज देणाऱ्या अभिजित लिमयेला अटक
लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले.
3 वर्षांपूर्वी -
देशात 2020 मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत दुपटीने वाढ - NCRB रिपोर्ट
देशातील धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे लागू निर्बंधांमुळे नागरिकांच्या हालचालीवर प्रतिबंध सीमित असतानाही धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत वाढ झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीत दिसून आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pornography Case | कुंद्राने बनवले होते 119 पॉर्न चित्रपट | 8.84 कोटीला विकायचे होते | आरोपपत्रात खुलासा
पॉर्न चित्रपट व्यवसायिक राज कुंद्राने 2 वर्षांत त्याच्या अॅपचे वापरकर्ते 3 पट आणि 8 पट नफा वाढवण्याची योजना आखली होती. राज कुंदाने आतापर्यत 119 पॉर्न चित्रपट बनवले असून त्याला हे चित्रपट 8.84 कोटी रुपयांना विकायचे होते. विशेष म्हणजे याप्रकरणी त्याच्या एका अॅपवर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. परंतु, त्याने आणखी एक अॅप तयार केले.
3 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा | मुंबई ट्रेनमध्ये विषारी वायू तर गर्दीच्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र?
नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या दहशतवादांकडून नवनवे खुलासे होत आहे. या दहशतवाद्यांच्या षडयंत्रबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादांचा मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं, असंही समजतंय. त्यातच मुंबई लोकलही दहशतवाद्यांच्या निशाणावर होतीच मात्र रेल्वेत विषारी वायू सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांच्या सुत्रांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र ATS आणि मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | दहशतवादी कारवाई प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी एका जणास नागपाडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयित आरोपीचे नाव झाकीर असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED Vs Anil Deshmukh | ED'कडून भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल | अनिल देशमुखांचं नाव वगळलं?
मनी लॉड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळाले. ईडीने अनिल देशमुखांशी संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. ईडीने अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. विशेष म्हणजे या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीत भाजप नगरसेवकाविरोधात विनयभंगाची तक्रार | भाजपकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही
कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Hyderabad Rape Case | 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार प्रकरण | रेल्वे ट्रॅकवर सापडला आरोपीचा मृतदेह
तेलंगणामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. पोलिसांनी शरीरावर असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली आहे. हा मृतदेह हैदराबादच्या सिंगारेनी कॉलनीतील बलात्कार आणि हत्येचा आरोपी पी राजू (30) याचा असल्याची माहिती तेलंगणाच्या डीजीपीने दिली आहे. आरोपीचा मृतदेह सापडल्याने विरोधक हैदराबाद पोलिस आणि सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत, कारण दोन दिवसांपूर्वी राज्याचे कामगार मंत्री मल्ल रेड्डी म्हणाले होते की, आम्ही आरोपींचे एन्काउंटर करुन मारुन टाकू.
3 वर्षांपूर्वी -
Pornography Case | पत्नी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या विरोधात साक्षीदार | चार्जशीट दाखल
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी साक्षीदार आहे. तसेच पोर्नोग्राफीबाबत वापरल्या जाणाऱ्या हॉटशॉट्स अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर आज (16 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणाले होते, योगी सरकारने यूपीतील गुन्हेगारी संपवली | पण NCRB रिपोर्टनुसार युपी गुन्हेगारीत देशात दुसरा
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेश आपल्याच हाती कायम ठेवण्यासाठी भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला होता.
3 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा दणका | राज्य सरकारच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या याचिकेत केलेल्या मागण्यांबाबत हायकोर्ट निर्णय देऊ इच्छित नाही. त्यामुळे परमबीर यांनी योग्य त्या लवादापुढे जाऊन दाद मागावी. तसेच लवादानं हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.ज. जमादार यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Pune Shivajirao Bhosale Co Operative Bank Scam | राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
Mr India Men’s Physique Champion Manoj Patil | मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न | साहिल खानवर आरोप
मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशात 2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना | २ भाजपशासित राज्य टॉप थ्री मध्ये | महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? - NCRB डेटा
महिलावंरील बलात्काराच्या घटनांबाबत धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोमधून (एनसीआरबी) समोर आली आहे. 2020 मध्ये रोज सरासरी 77 बलात्काराच्या घटना घडल्या आहे. या वर्षात 28,046 बलात्काराच्या घटना घडल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीमधून समोर आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Delhi Terrorist Arrest | महाराष्ट्र ATS प्रमुखांची सविस्तर माहिती | आशिष शेलार यांचा उतावळेपणा देखील उघड?
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Local Blast Terror Plan | राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही तासांनंतरच मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर कालिया 12 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता आणि 14 रोजी त्याच्या अटकेची बाब समोर आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला जात असताना शेखला कोटा येथून एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सणांच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी हल्ला करण्याचा कट | दिल्लीत 2 दहशतवाद्यांसह 6 जणांना अटक
दिल्लीत पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
महिलेला विनयभंग केल्याची खोटी तक्रार द्यायला लावत शिवसेना नगरसेवकाकडे खंडणीची मागणी | २ पत्रकारांना अटक
महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावून शिवसेनेच्या नागरसेवकाकडे बदनाम करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पत्रकारासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Saki Naka Rape Case | अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखाची मदत | वकील राजा ठाकरे यांची नेमणूक
गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी घटना गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS