महत्वाच्या बातम्या
-
आरोपांच्या आकड्यांचा हवेत गोळीबार? | किरीट सोमय्या यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ED, CBI दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता
शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Saki Naka Rape | नराधम आरोपी मोहन चौहान हा उत्तर प्रदेश जौनपूरचा असल्याची माहिती | 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Saki Naka Rape Case | गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार - मुख्यमंत्री
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
साकिनाका बलात्कार | पीडितेच्या आईने महापौरांना सांगितलेली हकिकत | पीडित महिला व आरोपी 10-12 वर्षापासून एकत्र राहायचे
मुंबईतील साकिनाका परिसरात एका 30 महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेत महिलेची प्रक़ृती चिंताजनक असल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज डॉक्टरांनी सदरील पीडित महिलेला मृत घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sakinaka Rape Case | राज्य सरकारने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू | आरोपी मोहन चौहानला कठोर शिक्षेची मागणी
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस | 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश
सीबीआयची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी लाच दिल्याचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना यांच्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीचं सावट आहे असं बोललं असताना अजून एका खासदारावर कारवाई करण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
DHFL ६५ कोटींचं कर्ज प्रकरण | नीलम राणे व नितेश राणेंविरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लूक आउट नोटीस जारी करण्यात आली. कंपन्यांकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कागदपत्रं लीक करून ED तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय | सुनावणी सुरु
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. परंतु आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
जमीन खरेदीत गैरव्यवहार | हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते | ED कोर्टाचं निरीक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांशी संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती.
3 वर्षांपूर्वी -
देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान | म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत - राष्ट्रवादी
अँटिलिया प्रकरणात एनआयएने सादर केलेल्या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परामबीर सिंहला वाचवलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना सिंह हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिशाभूल करत होते. सिंह यांना वाचवण्यासाठी भाजपने गृहमंत्र्यांवर आरोप केले. मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे परमबीर सिंह हा या सर्व घटनेचा मास्टरमाईंड आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच
अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया घटनेच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. यासाठी, परमबीरने त्या सायबर तज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
मोठा दिलासा | मनसेच्या गजानन काळेंना मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आधी प्रकरण कौटुंबिक असल्याचं म्हटलं | आता बीड भाजप करुणा शर्मांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार
जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा चाकू, तलवार अशी हत्यारे घेऊन कार्यकर्त्यांच्या घरात घुसून हल्ला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबवे येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास घडला.
3 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
3 वर्षांपूर्वी -
करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | आंबाजोगाई कोर्टाने शिक्षा सुनावली
जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS