16 April 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अमरावतीत 200 जिलेटिन कांड्या आणि 200 डेटोनेटर सापडले | NIA रस घेण्याची शक्यता कमीच

Amaravati Police, 200 gelatin sticks, 200 detonators, Tivasa police station

अमरावती, २० मार्च: मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 20 जिलेटिन कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत याप्रकरणात NIA ला जवाबदारी दिली. विषय थेट अंबानींशी निगडित असल्याने मोदी सरकार देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं आणि NIA ने देखील एखाद्या विषयात सुपरसॉनिक ऐतिहासिक वेगाने कारवाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.

देशात २० जिलेटिन कांड्याने वातावरण ढवळून निघालेलं असताना आता राज्यात अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्याअंतर्गत तब्बल 200 जिलेटिन कांड्या आणि 200 डेटोनेटर पोलिसांना सापडले आहेत. संशयावरून 2 अज्ञात मोटारसायकल चालकांना चौकशीसाठी थांबविण्यात आले होते. या वेळी त्यांनी आपल्याकडील बॅग फेकून तो तेथून पळाला. त्यामुळे यामागील नेमका घटक हेतू समजू शकलेला नाही.

पोलिसांनी जेव्हा या पिशव्या तपासल्या तेव्हा त्यात स्फोटके सापडली. त्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण केले आणि संपूर्ण तपासणीनंतर सुमारे 200 जिलेटिन आणि 200 जिवंत डिटोनेटर जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी या स्फोटकाचा अटक केलेला मालक सुमित सोनवणे याची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी आयपीसी आणि स्फोटक कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे स्फोटक कशासाठी घेतले जात होते याचा शोध घेण्यात येत आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे ही स्फोटके बाजारात विध्वंस निर्माण करण्यासाठी पुरेसे आहेत. आतापर्यंत सुमीतकडे या स्फोटकांच्या ताब्यात ठेवण्याबाबतचा कोणताही परवाना मिळालेला नाही. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांना सापडणे ही धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. त्याचा उपयोग नक्षलवादी आणि दहशतवादी दोघेही करू शकतात. दुसरीकडे २० कांड्या सापडल्यावर प्रकरण गांभीर्याने घेणारं NIA आता या २०० जिलेटिन आणि 200 जिवंत डिटोनेटर संबधित विषयात हात घालून कोणतीही सुपरसॉनिक वेगाने कारवाई किंवा तपास करेल याची शक्यता धूसर आहे. कारण विषय राजकीय फायद्याचा नसावा असं म्हणता येऊ शकतं.

 

News English Summary: While 20 gelatin sticks have stirred the atmosphere in the country, now the police have found 200 gelatin sticks and 200 detonators under Tivasa police station in Amravati district. Two unidentified motorcyclists were detained for questioning on suspicion. This time they threw their bags and he ran away. Therefore, the exact motive behind this could not be understood.

News English Title: Police have found 200 gelatin sticks and 200 detonators under Tivasa police station in Amravati district news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NIA(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या