21 January 2025 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

योगायोग? पूजाने ३ वर्ष भाजपसाठी काम | तर मृत्यूदिवशी इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवक

Pooja Chavan, Pooja Chavan's, BJP

मुंबई, १८ फेब्रुवारी: राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.

मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आलं तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही”. पुढे त्यांनी सांगितलं की, “पूजाने ३ वर्ष भारतीय जनता पक्षासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही.

केवळ बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची सखोल चौकशी झालेली नाही. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक जण भाजप नगरसेवक आहे. पण तेदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी, माहिती देण्यासाठी पुढे आलेले नाहीत.

पूजा चव्हाणनं आत्महत्या केली की भोवळ येऊन पडल्यानं तिचा मृत्यू झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पूजा इमारतीमधून पडल्यावर तिथे चार जण उपस्थित होते. अरुण राठोड, अनिल चव्हाण, भाजप नगरसेवक धनराज घोगरे आणि त्यांची पत्नी असे चौघेजण पूजाला घेऊन रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यामुळे हे चौघे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप तरी त्यांची सखोल चौकशी केलेली नाही.

 

News English Summary: Pooja Chavan’s father has also made further revelations while the political controversy is raging. Why are you making baseless allegations while the Pooja police investigation is underway? I’m sorry to hear that my daughter is gone. Even after appealing to stop defamation, the defamation must stop ”. He also said that it was wrong to add Arun Rathore’s name to the Pooja case and it had nothing to do with it. I had to talk to her at 2 pm on the day she committed suicide. She had also said that she had asked why she wanted more money, but she had said no.

News English Title: Pooja Chavan said Pooja was worked with BJP for 3 years news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x