22 December 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

यवतमाळमध्ये एका मुलीचा गर्भपात | कागदोपत्री नाव श्रीमती पूजा अरुण राठोड..ती नेमकी कोण?

Pooja Chavan suicide case, medical report, Pooja Arun Rathod, abortion

यवतमाळ, १७ फेब्रुवारी: बीडची टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तूर्तास अभय मिळाल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळपासूनच माध्यमांमध्ये राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारित केले जात होते. परंतु राठोड यांचा राजीनामा घेण्याचा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोणताही विचार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येतेय. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर ह्या प्रकरणात अरूण राठोडचं असलेलं कनेक्शन यावरुन पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे व्हायरल ऑडिओ क्लीप मध्ये देखील प्रेग्नंसीबाबत चर्चा होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. पूजा अरूण राठोड ही 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक 3 होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे. प्रसार माध्यमांनी डॉक्टरांशी संपर्क केला पण ते नॉट रिचेबल आहेत.

 

News English Summary: The Pooja Chavan suicide case has more information. A miscarriage of a girl named Pooja Arun Rathod has been reported at Vasantrao Naik Government Medical College in Yavatmal. No information has been given as to whether this Pooja is Arun Rathore’s Pooja Chavan. But based on the name Pooja and then Arun Rathore’s connection in this case, it is speculated that Pooja Chavan should be Pooja Arun Rathore.

News English Title: Pooja Chavan suicide case medical report of Pooja Arun Rathod abortion news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x