VIDEO | पूजा नंतर पूजाच्या पालकांची कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी सुरु | हे षडयंत्र?
यवतमाळ, ०१ मार्च: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. (Pooja Chavan’s cousin grandmother Shantabai Rathod made serious allegation on Poojas parent)
आता पूजाच्या चुलत आजीला पुढे करून पूजाच्या पालकांची देखील बदनामी सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. वास्तविक त्या पूजाच्या भावकीतील असून त्यांचा कधीही पूजाच्या कुटुंबाशी संबंध आलेला नाही असं पूजाच्या पालकांनी आधीच प्रसार माध्यमांना ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे. मात्र पूजाच्या घरी हजेरी लावणाऱ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित चुलत आजीला पुढे केल्याचं म्हटलं जातंय. कारण पूजाच्या पालकांनी संबंधित सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींना यावर राजकारण ना करता त्यांना भेट नाकारली होती. विशेष म्हणजे कोणताही आधार किंवा पुरावा नसताना संबंधित चुलत आजी मोठे आरोप पूजाच्या पालकांवर करत आहेत.
पूजा चव्हाणच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी तब्बल पाच कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. ‘पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासूनच आवाज उठवलेला आहे. पूजाचे आई वडिल काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई वडिलांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई वडिलांना पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहेत,’ असा दावा शांता यांनी केला.
VIDEO | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण | कोणताही पुरावा नसताना पुजाच्या चुलत आजी शांता राठोड यांचा पूजाच्या आई वडिलांवर गंभीर आरोप | पूजाच्या पालकांनी संजय राठोडांकडून ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप pic.twitter.com/kzfSCZxYF8
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) March 1, 2021
News English Summary: Controversy has erupted in the state over Pooja Chavan’s death. Today is the 19th day since the incident. Yesterday, Shiv Sena Minister Sanjay Rathore submitted his resignation to the Chief Minister. In this case, allegations are being made. Pooja Chavan’s cousin Shantabai Rathore, who came to file the case yesterday, was not booked by the Wanwadi police in Pune yesterday. Police said that a complaint has been lodged.
News English Title: Pooja Chavan’s cousin grandmother Shantabai Rathod made serious allegation on Poojas parent news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER