23 December 2024 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

पोर्न प्रकरणात राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | पोलिस अजून पुरावे गोळा करणार

Raj Kundra pornography case

मुंबई, २७ जुलै | पोर्न फिल्म बनवणे आणि ऑनलाइन वितरित केल्याप्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, आता चौकशी पुरे नवीन पुरावे गोळा करा असे म्हणत कोर्टाने कुंद्राला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी झालेल्या चौकशीत पोलिसांनी राज कुंद्राच्या विरोधात काही पुरावे गोळा केले होते. परंतु, कुंद्रासोबत काम केलेल्या लोकांची त्याच्या समोरा-समोर बसवून त्याची चौकशी करणे अजुनही बाकी आहे. सोबतच, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर सुद्धा कुंद्राची चौकशी अजून झालेली नाही. पोलिसांनी कोर्टात मंगळवारी कुंद्राशी संबंधित काही बँक खात्यांची माहिती दिली. सुनावणी सुरू असताना न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे, कुंद्राची गेल्या 8 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. चौकशी पुरे झाली आता मुंबई पोलिसांनी आणखी पुरावे गोळा करावे.

केवळ कुंद्राच नव्हे, तर त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रयान थॉर्प याला सुद्धा 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, कुंद्राचा जबाब आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. तर दुसरीकडे, शर्लीन चोप्रा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले.

शिल्पा शेट्टीचा जबाब:
अश्लिल व्हिडीओ प्रकरणात जेव्हा क्राइम ब्रांचचे अधिकारी राद कुंद्राच्या घरी पोहोचले होते. तेव्हा क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यासमोरच शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर भडकली. यावेळी ती म्हणाली,’ तु किती मोठा घोळ घातला आहे याची तुला कल्पना तरी आहे का? मला याबद्दल तु काहीच कसे सांगितले नाही. तुझ्या या कारस्थानामुळे आपल्या कुंटुबाचे नाव खराब झालं आहे. ‘ असे म्हणत ती राजवर ओरडत होती. या वादानंतर शिल्पाने रडत असातनाच पोलिसांना आपला जवाब दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raj Kundra pornography case Raj kundra sent to 14 days Judicial custody news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x