23 February 2025 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपच्या नेत्यावर सैन्यातील जवानाच्या पत्नीकडून बलात्काराचा आरोप | नेता फरार

Rape allegations, BJP leader, Madhya Pradesh

जबलपूर, ३० मार्च: भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल देशात सर्वांनाच आदर असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सीमेवर जवान शहीद झाल्यास जवानांच्या पत्नीला वीरपत्नी असं संबोधलं जातं. मात्र दुर्दैवाने त्यादेखील विकृत लोकांच्या वासनेच्या बळी ठरत आहेत. तसा धक्कादायक प्रकार घडला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडूनच आणि त्यामुळे सर्वत्र संताप असल्याचं पाहायला मिळतंय.

भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यावर जवानाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. एका महिलेने या नेत्यावर आरोप करत थेट स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित भाजयुमोचा नेता फरार झाला आहे. स्थानिक पोलीस भाजयुमो नेता राजेश श्रीवास्तव याचा सर्वत्र शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे या संबंधित पदाधिकाऱ्याचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर सावरकर वार्डातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राजेश श्रीवास्तव यांच्यावर सैन्यातील जवानाच्या पत्नीने बलात्काराचा आरोप लावला आहे, त्याचसोबत धमकी देत १० लाख रुपये मागितल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे. सैन्यातील जवानाची पत्नी घरात एकटी राहते, तेव्हा ही संधी साधून आरोपी राजेश श्रीवास्तव तिला भेटण्यासाठी जात असे. एकेदिवशी आरोपीने पीडित महिलेला एक कप चहा मागितला तेव्हा त्या महिलेच्या चहाच्या कपात नशेचा पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करत त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील काढले होते आणि त्या महिलेला ब्लॅकमेल करत धमकी देत होता. पीडित महिलेने जेव्हा तिचा पती सुट्टीला घरी आला, तेव्हा हा सगळा प्रकार त्याच्यावर कानावर टाकला, यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात १८ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. भाजप नेते मात्र प्रकारानंतर प्रसार माध्यमांपासून देऊ पळत असल्याचं मिळतंय.

 

News English Summary: Everyone in the country respects Indian soldiers and their families. If a jawan is martyred at the border, the wife of the jawan is called Veerapatni. But unfortunately they are also falling prey to the lust of perverted people. Such a shocking thing has happened from the leader of the Bharatiya Janata Party and there is anger everywhere.

News English Title: Rape allegations on BJP leader from Madhya Pradesh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x