14 January 2025 1:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

रेखा जरे हत्याकांड | मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास हैदराबाद येथून अटक

Rekha Jare murder case, Accuse Bal Bothe, Arrested

मुंबई, १३ मार्च: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. (Journalist Bal Bothe, the main facilitator in the murder of Rekha Jare Murder Case, president of Yashwini Mahila Brigade and social activist, has finally been arrested by the Ahmednagar police from Hyderabad)

दरम्यान, रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले.त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र ही न्यायालयात दाखल झाले आहे. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा चौफेर शोध घेत होते. बाळ कोठे सापडत नसल्यामुळे पोलिसांविषयी देखील संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. शनिवारी अखेर त्याला हैदराबाद येथून अटक झाली. सुपारी देऊन बोठे याने जरे यांची हत्या का केली? या प्रश्नाचा उलगडा आता होणार आहे.

कोर्टाने बोठे याला फरार घोषित करत 9 एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. तोपर्यंत तो हजर झाला नाही तर त्याच्या संपत्तीवर टाच लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. पोलिसांनी बोठे याच्या मालमत्ते विषयीचा तपशील गोळा केलेला होता. परंतु आता बोठे यास अटक झाल्यामुळे रेखा जरे हत्याकांडातील अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

News English Summary: Journalist Bal Bothe, the main facilitator in the murder of Rekha Jare Murder Case, president of Yashwini Mahila Brigade and social activist, has finally been arrested by the police. Ahmednagar police arrested him from Hyderabad on Saturday morning. He had been absconding for almost three and a half months after Rekha Jare’s murder.

News English Title: Rekha Jare murder case main accuse Bal Bothe finally arrested from Hyderabad news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x