15 January 2025 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

वकील नेमणाऱ्या रेणू शर्माचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे | वकीलांकडूनच रहस्यमय माहिती उघड

Renu Sharma, Dhananjay Munde, Krishana Hegde, Manish Dhuri

मुंबई, १४ जानेवारी: बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत.

दरम्यान भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान आता आरोप करणाऱ्या महिलेचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. माझ्या अशीलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून दागिने विकून ती स्वत:ची गुजराण करतेय. तिच्यावरील ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. सध्या तपास सुरु असल्यामुळे ते पुरावे मी उघड करु शकत नाही. तपासातून अनेक गोष्टी समोर येतील. व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंड बंद होतील. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी या गोष्टी उघड करु शकत नाही” असे रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

 

News English Summary: Ramesh Tripathi, counsel for the accused woman, while speaking to the media, revealed some shocking facts. My client has the illusion of a two-course meal. She has been making a living by selling jewelery for the last three months. The allegation of blackmailing her is false. We have a lot of evidence. I can’t disclose that evidence as an investigation is currently underway. The investigation will reveal many things. The mouths will close when the video clips come out. As the investigation is on, I cannot disclose these things, ”said Ramesh Tripathi.

News English Title: Renu Sharma advocate communicated with media over allegations Dhananjay Munde news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x